Facebook Layoffs : जगभरात मंदीचे ढग, ट्विटर पाठोपाठ फेसबुकही करणार कर्मचारी कपात
जगभरात मंदीचे ढग दाटू लागले आहेत. शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केलीये.. एका रिपोर्टनुसार मार्क झुकेरबर्गच्या कंपनीचा दावा आहे की, या आठवड्यापासून तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाईल.. याआधी इलॉन मस्क यांनींही ट्विटर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टाळेबंदीची घोषणाही केली... वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, मेटा शेअरहोल्डर अल्टिमीटर कॅपिटल मॅनेजमेंटने संस्थापक झुकरबर्ग यांना एक खुले पत्र लिहून कंपनीला नोकऱ्या आणि भांडवली खर्चात कपात करण्याची मागणी केलीये.. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने 1000 कर्मचार्यांना कामावरून काढलंय., तर रॉयल फिलिप्स एनव्हीने 4000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केलीये आता मेटा-मालकीचे फेसबुकदेखील या यादीत समाविष्ट होऊ शकतं...त्यामुळे मंदीच्या भीतीचे आता वास्तवात रुपांतर होताना दिसतंय..























