एक्स्प्लोर

Ashish Shelar : बिनखात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री नको; मंत्री आशिष शेलार असं का म्हणाले? ऑनलाईन गेमिंगवरही उत्तर 

Maharashtra Budget Session : ऑनलाईन गेमिंगचे व्यसन रोखण्यासाठी राज्यभर जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आवाहन मंत्री शेलार यांनी सदस्यांना केले. यासंबंधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. 

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात अनेक प्रश्न मांडण्यात आले आण त्यावर सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आलं. मात्र शिक्षण विभागाच्या संबंधित एका प्रश्नावरून मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विधानसभेतील सर्वांनाच हसू अनावर झाल्याचं दिसून आलं. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या एका सल्ल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यावर एक मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर सभागृहातील सर्वजण हसू लागले.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विभागाशी संबंधित लक्षवेधीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर दादा भुसे यांनी आशिष शेलार यांना सल्ला दिला. या आधी आशिष शेलार हे खातं सांभाळायचे, या पुढेही त्यांनी या खात्याचा कार्यभार सांभाळावा अशी मिश्किल टिपण्णी दादा भुसे यांनी केली. त्यावर बिनखात्याचा मंत्री राहीन पण शिक्षण विभागाचा मंत्री होणार नाही असं मिश्किल उत्तर आशिष शेलार यांनी दिलं. 

गेमिंग ॲप्सवर कडक कारवाईची मागणी (Action Against Gaming Apps)

राज्यात ऑनलाईन गेमिंग ॲप्समुळे लहान मुलांमध्ये मानसिक ताण वाढून आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार निरंजन डावखरे यांनी या संदर्भात कठोर कारवाईची मागणी करत IT कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी केली.

एका लहान मुलाने आत्महत्येपूर्वी ‘लॉग आउट’ असा उल्लेख केल्याची घटना आणि आरे कॉलनीत एका मुलीने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांनी सभागृहात मांडला. तसेच गाझियाबाद येथे तीन बहिणींनी ऑनलाईन टास्कच्या दबावाखाली आत्महत्या केल्याचा उल्लेख करत या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डावखरे यांनी गेमिंग ॲप्स तयार करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी केली. फक्त ॲपवर बंदी हा उपाय नाही. एक गेम बंद झाला तर तोच गेम दुसऱ्या नावाने पुन्हा सुरू होतो. त्यामुळे IT कायद्याच्या कलम 108 अंतर्गत कठोर कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले.

ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शासन याबाबत नेमकी काय पावले उचलत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टास्क फोर्सची स्थापना – मंत्री आशिष शेलार (Task Force on Online Gaming)

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, 2 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन गेमिंग विषयावर एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये कायदा आणि न्याय विभागासह संबंधित सर्व यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील अधिवेशनापूर्वी याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल.

यासोबतच दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. पालकांनी ‘डिजिटल लिटरेसी’ अंगीकारावी आणि मुलांसाठी ‘डिजिटल डाएट’ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनजागृती आणि ई-स्पोर्ट्सबाबत भूमिका (Digital Awareness & eSports)

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन रोखण्यासाठी राज्यभर जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही शेलार यांनी सदस्यांना केले. तसेच ई-स्पोर्ट्सला योग्य दिशा देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मुंबईत आयोजित करता येतील का, याचीही तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन गेमिंग, मुलांचे मानसिक आरोग्य आणि डिजिटल सुरक्षितता या तिन्ही मुद्द्यांवर राज्यात आता व्यापक धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.

ही बातमी वाचा: 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Embed widget