Zero Hour : लोकसभेआधी राज ठाकरे कोणती घोषणा करणार ? उद्या मनसेचा 'पाडवा मेळावा'
Zero Hour : लोकसभेआधी राज ठाकरे कोणती घोषणा करणार ? उद्या मनसेचा 'पाडवा मेळावा'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या झंझावाती प्रचारसभांसह राज ठाकरेंच्या अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेची..
बरोबर चोवीस तासांनंतर शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाढवा मेळावा होणारय.. आणि त्याच मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणारय.. गेल्या काही दिवसांच्या घडामोडींचा आढावा घेतला.. तर लक्षात येईल.. की, राज ठाकरे आणि महायुतीची वाढलेली जवळीक.. त्यातच राज ठाकरेंनी दिल्लीत जावून घेतलेली अमित शाहांची भेट... त्याच भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होणार.. याविषयी रंगलेल्या चर्चा... मविआकडून आघाडीत सामील होण्यासाठी राज ठाकरेंना मिळालेलं निमंत्रण.. आणि मग चर्चा थंडावल्याच्याही बातम्या ... पण ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं... दिल्लीवारीनंतर माध्यमांपासून दूर राहिलेले राज ठाकरे..
यासगळ्यामुळे घडामोडींनंतर राज ठाकरे काय बोलणार? याकडे महायुतीसह मविआचं लक्ष लागलंय.. हे सगळं असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलंय.