Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Santosh Dhuri joins BJP: कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) मनसेने वॉर्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी न दिल्यामुळे संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी सोमवारी संध्याकाळी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीची छायाचित्र समोर आल्यानंतर मनसेच्या (MNS) गोटात खळबळ उडाली होती. आज दुपारी संतोष धुरी (Santosh Dhuri) हे भाजपमध्ये (BJP) अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे सोडण्याच्या कारणाविषयी सविस्तर बोलण्यास नकार दिला असला तरी, 'मनसेत माझी कदर करण्यात आली नाही', असे एकच वाक्य त्यांनी उच्चारले.
मला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. मी गेल्या दोन दिवसांत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन. मला एक चांगलं वाटलं की, नितेश राणे हे आमच्या कोकणातील नेते आहेत. ते मला भेटायला आले. ते नेहमी माझ्या संपर्कात असायचे. काही काम असलं की मी त्यांना भेटायचो. त्यांनी अनेकदा आम्हाला मदत केली आहे. काल संध्याकाळी ते माझ्यासाठी सिंधुदुर्गावरुन प्रवास करुन मुंबईत आले, या गोष्टीचे मला चांगले वाटते. मनसेत माझी कदर झाली नाही, असे संतोष धुरी यांनी म्हटले.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























