Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
आज मंगळवार... बरोबर आठवड्यानं, म्हणजे पुढल्या मंगळवारी, जेव्हा आपला राजकीय शोले सुरू होईल, त्यापूर्वी प्रचार संपलेला असेल... सहाजिकच पुढला आठवडा हा झंझावाती सभांचा, रोड शोचा असेल... कार्यकर्ते मतदारांच्या दारी जाताना दिसतील... मात्र निवडणूक ९ दिवसांवर आली असताना अद्याप ठाकरे बंधूंची एकही मोठी सभा झालेली नाही... मोठा गाजावाजा करत अस्तित्वात आलेल्या ठाकरेंच्या युतीचे नेते अजून पक्षाच्या शाखांना भेटी देतायत... 'ब्रँड ठाकरे'नं या निवडणुकीत ही कोणती नवी रणनीती आखलीये, याची चर्चा सुरूय... यावरच आधारित हा आमचा स्पेशल रिपोर्ट...
निवडणूक आली की प्रचाराच्या तोफा अशा धडाडू लागतात...
एरवी कार्यकर्त्यांना सहजासहजी न भेटणारी नेतेमंडळी जमिनीवर उतरतात...
पायाला भिंगरी बांधून नेते एका शहरातून दुसऱ्या शहरात जात भाषणं ठोकतात...
या प्रचारसभा म्हणजे पक्षांना आणि उमेदवारांना शक्तिप्रदर्शन करण्याची संधी...
दरवेळी निवडणुकीत दिसणारं हे चित्र यावेळी जरा बदललेलं दिसतंय...
एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय...
तर दुसरीकडे नव्यानं उदयाला आलेल्या 'ब्रँड ठाकरे'ची एकही मोठी जाहीर सभा अजून झालेली नाही...
याउलट उद्धव, राज, आदित्य, अमित हे चार ठाकरे आपापल्या पक्षाच्या शाखांना भेटी देण्यात व्यस्त आहेत...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























