एक्स्प्लोर

Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?

Uddhav Thackeray Thane Election 2026: किरीट सोमय्यांच्या मुलाच्या वॉर्डात जो डाव टाकला, तसाच पॅटर्न उद्धव ठाकरेंनी ठाण्यातही वापरला. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

Thane Mahangarpalika Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याचा बिनविरोध विजय होण्याची शक्यता लक्षात आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी मुलुंडमधील वॉर्ड क्रमांक 107 मध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत राजकीय डाव टाकला होता. ठाणे महानगरपालिकेच्या दोन प्रभागांमध्येही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अशीच खेळी करत याठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा डाव उधळून लावला आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या (Thane Mahangarplaika Election 2026) रणधुमाळीत दोन प्रभागात निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी या दोन प्रभागांमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवारांना पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. या उमेदवारांनी उबाठात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन प्रभागांमधील लढाई चुरशीची होण्याची शक्यता आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या वसंत विहार येथील प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये ठाकरे गटाचे उमेदवार दादाभाऊ रेपाळे यांनी शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. ते नॉट रिचेबल  झाल्याने ठाकरेंच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये शिंदे गटाच्या उमेदवार जयश्री डेव्हिड यांचा विजय सुकर झाल्याची चर्चा रंगली होती. ही परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार विक्रम चव्हाण यांना पाठिंबा देऊ केला आहे. विशेष म्हणजे या प्रभागात विक्रम चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज बाद करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता. बंडखोर विक्रम चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्थानिक स्तरावर भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान उमेदवारी अर्जात विक्रम चव्हाण यांचा सूचक असलेल्या व्यक्तीने परस्पर उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विक्रम चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. मात्र, विक्रम चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला होता. अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला होता. त्याच अपक्ष विक्रांत चव्हाण यांना उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये पाठिंबा दिल्याने शिंदे गटाच्या जयश्री डेव्हिड यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे विक्रांत चव्हाण यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि स्थानिक पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. 

तर ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक 16 (ड) येथेही ठाकरे गटाने अपक्ष उमेदवारालाच आपला मोहरा बनवले आहे. याठिकाणी शिंदे गटाच्या माणिक पाटील यांनी उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोज शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. या प्रभागत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाने या प्रभागात आपली सर्व ताकद शिंदे गटाचे बंडखोर माणिक पाटील यांच्या पाठीशी उभी केली आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत माणिक पाटील यांनी मनोज शिंदेंच्या भावाचा पराभव केला होता. या प्रभागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 (ड) मध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा

भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा' माणसाने बोललं तर बरं, पण एखाद्या बाईने म्हटले की....; श्वेता महालेंच्या टीकेला आमदार संजय गायकवाडांचं तिखट प्रत्युत्तर, बुलढाण्यात महायुतीतच जुंपली
'बाप तो बाप रहेगा' माणसाने बोललं तर बरं, पण एखाद्या बाईने म्हटले की....; श्वेता महालेंच्या टीकेला आमदार संजय गायकवाडांचं तिखट प्रत्युत्तर, बुलढाण्यात महायुतीतच जुंपली
Shivsena UBT BMC Corporator Vishakha Raut: विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट समोर
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट
Shivendraraje Bhosle on Shashikant Shinde: 'जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की...'; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना नाव न घेता कडक इशारा
'जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की...'; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना नाव न घेता कडक इशारा
Sugar Price Diwali: मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Silver Rate : चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
Shivsena UBT BMC Corporator Vishakha Raut: विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट समोर
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Embed widget