Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
प्रचाराची पातळी घसरली आहे असं प्रत्येक पिढीला वाटत असतं आणि त्यात तथ्य सुद्धा असतं. पशु-पक्षी-प्राणी-असूर अशा सगळ्या उपमांचा वापर सर्रास वाढलाय. मात्र प्रत्येक काळात काही संकेत पाळले जायचे, एखाद्या निर्णयावर, केलेल्या- न केलेल्या कामावर टीका जरुर केली जायची पण त्यातही एक सभ्यता पाळली जायची, वैयक्तिक पातळीवर घसरण्याचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. त्याचं भान राखलं नाही तर काय होतं याचा अनुभव भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेत आहेत. लातूरमध्ये जाऊन ते एक चुकीचं वाक्य बोलले, पुढे काय झालं पाहुयात
लातूर म्हणजे काँग्रेसचा एकेकाळचा गड
लातूर म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुखांचा बालेकिल्ला
अशा लातूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी पोहोचले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
समोरची गर्दी बघून आपल्या भाषणाची धडाकेबाज सुरुवात करण्याचा मोह त्यांना झाला
आणि त्या नादात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं
लातूर आणि विलासरावांचं नातं ज्यांना माहिती आहे असा सामान्य लातूरकर चव्हाणांच्या वक्तव्यामुळे कमालीचा नाराज झाला.
रवींद्र चव्हाणांचा पुतळा जाळला.
रेणापूर, शिरूर अनंतपाळ, लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्तेंनी जोडे मारो आंदोलनही केलं
जालन्यातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























