महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
जाहीरनामा करताना आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरत थेट शहरवासियांशी चर्चा करून समस्या समजून घेतल्या होत्या. यासाठी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं ही टॅगलाईन घेत मोहीम राबवण्यात आली होती.

Kolhapur Municipal Coropration Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. कोल्हापुरात महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत केएमटी प्रवास, महिलांसाठी आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करून उत्तम रस्ते, जयप्रभा स्टुडिओ महापालिकेच्या ताब्यात घेतला जाईल, आदी मुद्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन घेतलं. यावेळी शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांनी जाहीरनामा अंबाबाई चरणी विधिवत पूजा करून अर्पण केला. यावेळी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
जाहीरनामा करताना आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरत थेट शहरवासियांशी चर्चा करून समस्या समजून घेतल्या होत्या. यासाठी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं ही टॅगलाईन घेत मोहीम राबवण्यात आली होती.
काय आहे जाहीरनाम्यात?
- महिलांना आणि विद्यार्थ्यांना केएमटी बसने प्रवास संपूर्ण मोफत प्रवास
- कोल्हापूर शहरातील दोन लाख 60 हजार महिलांना आरोग्य कवच
- विनायक कोल्हापूर शहरात महिलांसाठी फिरते पिंक स्वच्छतागृह उभारणार
- अचानक आलेल्या अति गंभीर आजारावर वैद्यकीय उपचारासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत
- कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे ऑडिट करून केले जातील
- कोल्हापूरच्या शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरांतर्गत उड्डाणपूल उभा केले जाणार
- अमृत योजनेची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करून 24 तास शुद्ध पाणी दिलं जाणार
- कोल्हापूर शहरात 10 ठिकाणी 7000 गाड्या पार्क होतील अशी व्यवस्था केली जाईल
- फेरीवाल्यांना सन्मानाने व्यवसाय करता यावा यासाठी शहरात होकर्स तयार करणार
- लोकप्रिय खेळांसाठी स्वतंत्र मैदाने तयार केली जाणार
- कोल्हापूर शहरात जास्तीत जास्त आय टी कंपन्या येण्यासाठी करामध्ये विशेष सवलत दिली जाणार
- पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबवून पंचगंगा प्रदूषण मुक्त करणार
- कोल्हापूर शहरातील मोकळ्या जागांवर झाडे लावून ऑक्सिजन पार्क तयार करणार
- कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल
- भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी टक्केवारी संस्कृती मुळापासून काढून टाकणार
- कोल्हापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी शहराची हद्दवाढ केली जाणार
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा स्थानिकांना विश्वासात घेऊन पूर्ण करणार
- कोल्हापूर विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज असे केले जाईल
इतर महत्वाच्या बातम्या




















