Zero Hour : महायुती प्रवेशाचा मनसेला फायदा की तोटा ? राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बैठक
Zero Hour : महायुती प्रवेशाचा मनसेला फायदा की तोटा ? राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बैठक दिल्लीवारीत राज ठाकरेंनी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय चाणक्य अमित शाह यांची भेट घेतली होती.. त्यानंतर राज्यातल्या भेटीगाठींना वेग आला आहे. आणि महायुतीत मनसे सामील होणार हे जवळपास निश्चित झालं.. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज मुंबईत भेटले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् एंड मध्ये जवळपास दीड तास या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली... सगळ्यात महत्वाचं म्हणजे.... जेव्हा ही बैठक सुरु झाली.. तेव्हा फक्त ते तीन नेतेच एकत्र होते.. त्यामुळे ही बैठक महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जातेय.. आजच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली असेल, असा कयास सगळेच जण बांधत आहेत मात्र सध्याच्या चर्चेतून यापेक्षा वेगळा.. मोठा.. आणि धक्कादायक निर्णय सुद्धा येईल असा अंदाज काही तज्ञ लावत आहेत.
जेव्हा दिल्लीत मनसेसंदर्भात चर्चा झाली.. तेव्हा हा निर्णय झाला होता की मनसेला महायुतीत सामील करण्याचासंदर्भातले सगळे निर्णय़ महाराष्ट्रात होतील.. खरंतर, मनसेनं लोकसभेच्या ज्या ज्या जागांची मनसेंनं मागणी केलीय.. त्या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत.. मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीवर शिंदेंचाही ग्रीन सिग्नल महत्वाचा ठरतो.. आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न..