Zero Hour Guest Centre : सरकारच्या आश्वासक उत्तराशिवाय आंदोलन मागे घेणार नाही : Laxman Hake
Zero Hour Guest Centre : सरकारच्या आश्वासक उत्तराशिवाय आंदोलन मागे घेणार नाही : Laxman Hake ओबीसी संदर्भातील बैठकीनंतर मनोज जरांगेंनी स्पष्ट अशी प्रतिक्रिया जरी दिली नसली ... तर आज दिवस गाजला तो... हाके विरुद्ध जरांगे यांच्यातील वाकयुद्धानं.. रुग्णालयातून बाहेर पडताच, मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय.. लोकसभा निवडणुकीत, मराठ्यांच्या रोषाचा झटका नक्कीच सरकारला बसलाय.. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीही आक्रमक झाल्याने... दूधाने तोंड पोळलेला, जसं ताकही फुंकून पितो.. तसं राज्य सरकारही एक एक पाऊल टाकत आहे.. उपोषण मागे घेऊन, मनोज जरांगेंनी मराठा प्रश्नी एक महिन्याचा वेळ दिल्याने.. सरकार आता ओबीसींच्या आघाडीवर लढतंय.. बैठका, चर्चासत्र, मंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.. एकाचवेळी मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिल्याने, राज्य सरकारची कोंडी झालीय.. पण प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावरून मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर टीका केलीय.. मनोज जरांगेंनी एबीपी माझाशी बोलताना.. राज्य सरकार जाणूनबुजून मराठा विरुद्ध ओबीसींमध्ये जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केलाय.. तसंच जर आरक्षणप्रश्नी, सगेसोयऱ्यावरून सरकारने मराठ्यांची फसवणूक केली तर, आगामी निवडणुकीत आम्ही तुम्हाला डुबवू असा इशाराही जरांगेंनी दिला...