Zero Hour Guest Center : अजित पवार वेगळे लढल्यास महायुतीला फटका? Sudhir Mungantiwar Exclusive
Zero Hour Guest Center : अजित पवार वेगळे लढल्यास महायुतीला फटका? Sudhir Mungantiwar Exclusive शुभेच्छा... आता म्हटलं तर दोघेही उपमुख्यमंत्री महत्वाकांक्षी आहेत ...दोघांनाही मुख्यमंत्री बनायचे आहे ...एकाने मी पुन्हा येईन हे म्हटले आहेच तर दुसऱ्याने हि आपली महत्वाकांक्षा लपवलेली नाही ... मात्र काही काळासाठी ह्या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाच्या ह्या लालसेपासून टाईम प्लिज घेतली आहे.
अगदी कालच देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पुण्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री महायुतीचाच असणार असे म्हटले पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारू नका, हा विषय इथेच संपला असे म्हटले ...तिथे अजितदादांनि सुद्धा सर्वांनी मिळून ते ठरवायचे असे म्हटले ...पण उत्साही कार्यकर्त्यांसाठी मात्र दिल है कि मानता नही ...
दादांच्या वाढदिवसानिमित्त केकवर तर भावी मुख्यमंत्री लिहिलेच पण त्याचबरोबर शहरा शहरात पोस्टरवर हि अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणूनच उल्लेख केल्या गेलाय ... तर तिथे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार हि मागे नव्हते ... शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तर पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार असा पाढा अगदी आजही गिरवला.
त्यातच अजित पवारांचं एक वक्तव्य.. राजकीय दृष्ट्या महत्वाचे म्हणावे लागेल ... ज्यानं महायुतीचं थोडं टेन्शन... आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढू शकतो.
आधी ते वक्तव्य पाहुयात.. मग विश्लेषण...