एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

नमस्कार मी सरिता कौशिक, झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... संसदेच्या विरोधी पक्षनेत्यानं एक वक्तव्य केलं... आणि त्यावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालंय.. हि राज्यासाठी मोठी बातमी आहे कारण आजवर राज्यात ह्या आधी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याचे कधीही निलंबन झालेले नाही ... पण ते आज ५ दिवसासाठी झाले आहे ....
 
त्याचं झालं असं की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपला टार्गेट करत असताना हिंदूंवरुन एक वक्तव्य केलं आणि भाजपनं त्या वक्तव्याचा आधार घेत देशभरात निदर्शनं केली.. इतकंच नाही तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले.. कालच विधान परिषदेत.. राहुल गांधींच्या 'हिंदू'बाबतच्या वक्तव्यावरून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता.. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी.. भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळदेखील केली.. तसंच अंगावरही धावून गेले... त्यानंतर आज आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनी, दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.. तसंच कारवाई करण्याची मागणी केली.. यानंतर विधान परिषदेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांंनी, अंबादास दानवेंवर निलंबनाच्या कारवाईसंदर्भात प्रस्ताव मांडला... यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंंनी अंबादास दानवेंंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं...आज अगदी काही वेळात हि निलंबनाची कारवाई करणाऱ्या डॉक्टर नीलम गोर्हे झीरो अवर मध्ये आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेतच ... आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या देतीलच ... मात्र त्याआधी  सभागृहात नेमकं काय घडलं ते पाहुयात..

राज्यात सध्या निवडणुकांचा ज्वर तापतोय.. लोकसभेच्या निकालांनंतर तर सर्वच पक्षांचा, नेत्यांचा सूर बदललाय.. त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.. महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांचीही दबक्या आवाजात कुजबूज ऐकू येतेय.. त्यातच २०१९पासून एकमेकांना पाण्यात पाहणारे ठाकरे आणि भाजपमध्ये.. विशेषत: देवेंद्र फडणवीसांसोबत पुसटसा संवादही सुरू झालाय.. २७ जून रोजी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी, एकत्रित लिफ्टने प्रवास केला होता.. त्या भेटीने राजकीय वर्तुळात धुरळा उडालेला असतानाच.. आज विधानभवनच्या लॉबीमध्ये अचानक आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले.. यावेळी दोघांमध्ये हास्यविनोदही झाला.. या भेटीवेळी अंबादास दानवेसुद्धा उपस्थित होते.. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत दोन ठाकरेंशी फडणवीसांशी झालेल्या अचानक भेटीच्या, योगायोगाची चांगलीच चर्चा झडतेय...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget