एक्स्प्लोर

एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...

महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत.

सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हत्याकांडानंतर राजकीय सोलापुरातील वर्तुळातूनही स्थानिक भाजप नेत्यांवर टीका होत आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज माघारी घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या खटाटोपातून हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज सोलापुरात (Solapur) मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, घडल्या प्रकाराबाबत मत व्यक्त करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. तसेच, आपण मुख्यमंत्र्‍यांना भेटणार असून राज ठाकरे यांच्याही कानावर ही घटना घातल्याचं त्यांनी म्हटलं.

महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरुन आता खून करू लागले आहेत. समोरच्या पक्षातल्या लीडरकडे देखील मुलं-मुली आहेत, मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बघावं, असे म्हणत अमित ठाकरे यांनी सोलापुरातील घटनेवरुन संताप व्यक्त केला. अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्हीच जिंका अशा निवडणुका? महाराष्ट्राची ही परिस्थिती आणून ठेवलीय तुम्ही, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

कधी कोणीही वारल्यावर मी राजकारण करत नाही, आज देखील सांत्वन करायला आलो आहे. तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? आपल्या सगळ्यातला माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आपलं राज्य कुठे चाललं आहे त्यांनी पाहिलं पाहिजे, असेही अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून म्हटले. तसेच, एक आई, दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आले आहेत, ही कोणती परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे, बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी मला 10 मिनिटे वेळ द्यावा

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून दहा मिनिटे वेळ मला द्यावी, मी सर्व विषय त्यांच्यासमोर मांडेन. सोलापूरकर म्हणून विचार केला पाहिजे, कुठे नेऊन ठेवतोय आपलं शहर? असेही अमित ठाकरे यांनी म्हटले. तर, मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करणार, मी इथे आर्थिक विषयावर काही बोलणार नाही, राज साहेबांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं केलं आहे, अशी माहितीही अमित यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Embed widget