Zero Hour Atul Londhe :Congress- George Soros संबंधांवर संसदेत सत्ताधारी आक्रमक,अतुल लोंढे EXCLUSIVE
आता आपण खासदार वर्षा गायकवाडांना ऐकलं.. पण, मित्रपक्षांच्या याच भूमिकेवर काँग्रेसची भूमिका आणखी सखोलपणे समजून घेण्यासाठी आता आपण गेस्ट सेंटरला जावूयात.. जिथं आपल्यासोबत आहेत.. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे....
१. शरद पवार, लालू प्रसाद यादव ते संजय राऊत.. प्रमुख मित्रपक्षांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरुन ममतांचं नाव पुढे केलंय.. काँग्रेसची भूमिका काय असेल?
२. इंडिया आघाडीला मजबूत नेतृत्व हवं... पूर्ण वेळ नेतृत्व हवं.. अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होतेय.. तुमचं मत काय आहे?
३. तृणमूलच्या खासदारांनी काँग्रेसच्या स्ट्राईक रेटवरुन भाष्य करत... मोदींना रोखायचं असेल तर ममतादीदींसारखं कणखर नेतृत्व हवं.. अशी मागणी केलीय.. वेळ आली तर काँग्रेस ममतांचं नेतृत्व मान्य करेल?
४. याच वर्षी जानेवारीत मल्लिकार्जुन खरगेंना इंडिया आघाडीच्या नेतेपदी निवडलं होतं... इंडियाच्या आघाडीच्या नेतृत्त्वासाठी आग्रही असलेले नीतिशकुमार सोडून गेले आणि आता वर्षभराच्या आत मित्रपक्षांकडून ममता बॅनर्जी यांच्या रुपानं नवं नाव पुढे करण्यात येत आहे... यावर तुमचं मत काय आहे?