PM Modi Cabinet Eknath Shinde Ajit Pawar : शिंदे-दादांची बार्गेनिंग पॉवर कमी पडली का? Special Report
केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झालं, मोदी सरकार स्थापन झालं... मात्र केंद्रात सत्तेत जाऊन मानाचं पान पटकावण्याचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं स्वप्न मात्र सध्यातरी अपूर्णच राहीलं... आणि हाच मुद्दा राज्यातल्या राजकारणात असंतोषाची नांदी ठरणार का...? अजित पवार, एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली की भाजपने या आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष केलं असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे... पाहा हा रिपोर्ट
मुख्यमंत्री शिंदे,
अजित पवारांची
बार्गेनिंग पॉवर कमी पडली का?
भाजपप्रणित एनडीएमध्ये
शिंदे, अजित पवार
उपेक्षित झाले का ?
महाराष्ट्रात महायुतीच्या नावाने एकत्र आलेले
भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी...
राज्यातले हे तीन मित्र सत्ताधारी बाकांवर मांडीला मांडी लावून बसतात खरे...
मात्र जेव्हा गोष्ट दिल्लीत जाते तेव्हा राज्यातले हे मित्र
भाजपच्या दृष्टीने गौण ठरतात का? असा प्रश्न निर्माण झालाय..
त्याला कारण ठरलंय एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा...
राज्यात मानाचं पान मिळवणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना
केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही अशी चर्चा सुरू झालीय.
अर्थात आकडेवारी पाहिली तर त्यात तथ्यही दिसतंय,