Mumbai COVID Center Scam : SIT चा डाव? ठाकरेंवर घाव? मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार? Special Report
कोरोनाचा अंगावर काटा आणणारा काळ... रस्त्यावर माणूस ना, काणूस... कधीकाळी गर्दीने फुलणारे रस्ते, ओसाड, निर्मनुष्य आणि शांत... जिथून तिथून एकच शब्द कानावर यायचा... कोरोना... कोरोना आणि कोरोना... आणि या सगळ्यात वेळोवेळी सूचना देण्यासाठी लाईव्ह येणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... असं सगळं भयग्रस्त वातावरण असताना... चालती-बोलती माणसं एका क्षणात जगातून जात असताना... मुंबईत भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला जात होता का?, क्वारंटाईन सेंटरच्या माध्यमातून, महापालिकेला पोखरण्याचे उद्योग चालले होते का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेयत... त्याचसोबत, या सगळ्या भ्रष्टाचाराची सुई आता मातोश्रीकडे वळलीय का? हा प्रश्व सर्वांना पडलाय... याच प्रश्नांना थेट भिडणारा, पाहूयात सविस्तर रिपोर्ट...
All Shows































