MPSC Hall Ticket Special Report : 400 डॉलर्ससाठी हॉल तिकिट व्हायरल, डार्कनेट कनेक्शन काय?
MPSC Hall Ticket Special Report : 400 डॉलर्ससाठी हॉल तिकिट व्हायरल, डार्कनेट कनेक्शन काय?
एका तरुणानं ४०० डॉलरची सुपारी घेऊन एमपीएससी परीक्षेची ९४ हजार प्रवेशपत्रं व्हायरल केली, असं सांगितलं तर तुम्हाला ते खरं वाटेल का? मंडळी, हा गुन्हा घडला हे वास्तव आहे. तसं पाहिलं तर, आजवर सुपारी घेऊन अनेक गुन्हे झाल्याचं तुम्ही आम्ही ऐकलंय. वाचलंयही. पण रोहित कांबळे या डिजिटल सायन्सच्या विद्यार्थ्यानं चक्क ४०० डॉलर्सच्या सुपारीसाठी एमपीएससी परीक्षेची तब्बल ९४ हजार प्रवेशपत्रं व्हायरल केली. त्यामुळं एमपीएससीची वेबसाईट किती सुरक्षित आहे आणि वाढत्या सायबर क्राईमवर पोलिसांसह प्रशासन काय कठोर निर्णय घेणार, असा सवाल उपस्थित होतोय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows

































