India Vs Pakistan War : भारताची अभेद्य यंत्रणा, पाकची लक्तर Special Report
D.G.A.O. एअर मार्शल ए.के. भारती, DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई
आणि DGNO वाईस अॅडमिरल ए.एन. प्रमोद.. सैन्यदलाच्या या तीन मोठ्या अधिकाऱ्य़ांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. कधी राष्ट्रकवी दिनकरांच्या शब्दातील कृष्णनीती, कधी रामचरित मानसमधील दोहे तर कधी क्रिकेटचे दाखले देत पाकिस्तानला इशारा दिला. या तिघांनी भारताने पाकवर केलेल्या प्रतिहल्ल्यासाठी नैतिक अधिष्ठान काय आहे हे सुद्धा स्पष्ट केलं. पाकिस्तानची झालेली वाताहत पुराव्यानिशी जगासमोर मांडली. या निमित्तानं एका प्रोफेशनल आर्मीचे प्रोफेशनल अधिकारी कसे असतात हे जगाला पुन्हा पाहायला मिळालं.
ऑपरेशन सिंदूरचे अपडेट देण्यासाठी भारतीय सैन्यदलाचे तीन मोठे अधिकारी दुसऱ्यांदा एकत्र जमले
सैन्यदलाची कामगिरी सांगताना काल पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शिवतांडवचे सूर घुमले होते
((कालचा ओपनिंगचा व्हिडिओ मूझिकसह वापरणे))
आज सुरुवातीला कानावर पडले कृष्णनीतीचे शब्द... ((आजचा ओपनिंग एव्हीचा शब्द ऐकू येतील असा भाग, हे दोन्ही व्हिडिओ INDIAN ARMY च्या ट्विटरवर, फेबुवर आहेत ))
राष्ट्रकवी दिनकर यांच्या शब्दात ज्याचा सार होता- याचना नही अब रण होगा..
दुर्योधनाप्रमाणे पाकिस्तानला समजावून सांगण्याचे सगळे प्रयत्न करुन पाहिले तरी तो ऐकत नाही, हल्ल्यावर हल्ले करतोय त्याला उत्तर म्हणून भारताने शेवटचा पर्याय वापरला,- याचना नही अब रण होगा- या भूमिकेतून भारताने प्रतिहल्ला चढवला.
भारतीय सैन्यदलाचा हा संदेश तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानसह जगाला सांगितला.
एका प्रश्नाच्या उत्तरात एअर मार्शल एके भारती यांनी रामचरित मानसचा दोह्याचा दाखला दिला..ज्यात लंकेला जाण्यासाठी समुद्रदेवतेची प्रार्थना करुन उपयोग झाला नाही तेव्हा श्रीरामाने धनुष्याला बाण लावला, हा प्रसंग सांगत भारताची नैतिक भूमिका स्पष्ट केली आणि पाकला इशारा दिला.
बाईट - एअर मार्शल एके भारती
एअर मार्शल एके भारतींपासून DGMO राजीव घई यांनी प्रेरणा घेतली आणि क्रिकेटचं उदाहरण दिलं,एशेस मालिकेत जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची शिकार करणाऱ्या लिली थॉम्प्सन या वेगवान गोलंदाजांच्या जोडीप्रमाणे भारतीय सैन्यदलाने पाकच्या दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्या ठिकाणांची अचूक शिकार केली हे जगाला सांगितलं.
बाईट - राजीव घई
((https://www.youtube.com/live/F3k4na27bmc?si=l2Eg-F2tdHR5qzry&t=932
यात चांगले ७०-३० केलेले बाईट आहेत))
कांगावेखोर आणि विश्वासघातकी पाकिस्तानचा बुरखा भारतीय सैन्यदलाने पुन्हा एकदा फाडला.पाकिस्तानचे सगळे खोटे दावे एक एक करत पुराव्यासह उधळून लावले. भारताची हवाई सुरक्षा यंत्रणा अभेद्य आहे आणि पाकिस्तान ती भेदू शकला नाही, हे सांगतानाच आपल्या वायुसेनेचा भीम पराक्रमही सांगितला. टर्कीश ड्रोनपासून ते चीनी क्षेपणास्त्राच्या अवशेषांची आठवण करुन दिली
२-३ विंडो बाईट - जे चांगले असतील ते
आमची लढाई पाकिस्तान सैन्यासोबत नाही तर त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांसोबत आहे यावर भारताने पुन्हा एकदा भर दिला.
पण दहशतवाद्यांच्या मदतीला पाक सेना आली तर तक्षकाय इंद्राय स्वाहा म्हणजे दहशतवाद्यांसोबत पाक सैन्याचीही आहुती पडेल हे सांगायला आपले अधिकारी विसरले नाहीत.
ब्युरो रिपोर्ट,एबीपी माझा
All Shows

































