(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli :सी- ६० कमांडोंचं अतुलनीय शौर्य;6 तास 12 नक्षलवाद्यांचा खात्मा,थरारक ऑपरेश Special Report
गडचिरोली जिल्हा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात, नक्षलवादी कारवाया... याच रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडण्याचं काम आपल्या सी- ६० च्या बहाद्दर वीर जवानांनी केलंय... ६ तासांत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करत, उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादीमुक्त कसं झालं... आणि हे थरारक मिशन कसं पार पडलं, त्याचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...
गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी जवानांनी घटनास्थळावरून 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. यापैकी जवानांनी तीन एके-47, दोन इन्सास आणि एक कार्बाइन तसेच एक एसएलआर जप्त केला आहे. या भागात गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या चकमकीत C-60 कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. कांकेर जिल्ह्यातील पोलीस छावणीतून त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडचिरोली येथील बांदा कॅम्प येथे नेण्यात आले आहे. सध्या या जवानाचे प्राण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.