Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : घोषणेनंतरही दादांना गराडा, स्क्रिप्टेड राडा? Special Report
अजितदादा पवार बारामतीतून लढणार का?,खुद्द दादांनीच वारंवार केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता... पण प्रफुल्ल पटेलांनी दादा बारामतीतूनच लढणार अशी घोषणाच करून टाकली... त्यामुळे सगळ्या चर्चांना फुलस्टॉप लागला... मात्र तरीही बारामतीत अजित पवारांची गाडी कार्यकर्त्यांनी अडवली... त्यामुळे सहानुभूतीसाठी हा माईंडगेमे आहे का? आणि हा राडा स्क्रिप्टेड होता का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत... पाहूयात...
दादांचं गाव... दादांचं मैदान... दादांचा
बालेकिल्ला... आणि त्याच बारामतीत दादांची
गाडी अडवली... भर चौकात... कशाचा
निषेध नाही... की कसला राग नाही...
तुम्हाला प्रश्न पडला असेल दादांची या
शेकडो कार्यकर्त्यांनी वाट का अडवली
असेल... तर त्यातलाच एक कार्यकर्ता काय
म्हणतोय पाहा...
दादांचा बारामतीला वळसा का?
लोकसभा निवडणुकीत
पत्नी सुनेत्रा पवारांचा
दारूण पराभव
बारामती शरद
पवारांमागे उभी
राहिल्याचं चित्र
बंडामुळे कुटुंब
दूर झाल्याची
दादांकडून खंत
व्यक्त
विधानसभेला
बारामतीत धक्का
बसण्याची धास्ती?
दादांनी शिरूरमधून
लढण्याची चाचपणी
केल्याची चर्चा