ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 07 March 2025
एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी, शिंदेंनी घेतलेले निर्णयसुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण
पुढील ५ वर्षांत वीजेचे दर २४ टक्क्यांनी कमी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, स्मार्ट मीटर लावलं तर दिवसा १० टक्के वीजबिलावर सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
डावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याची आकडेवारी सादर, राज्यात १ लाख ३९ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर, आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज तर दरडोई उत्पन्न वाढीचाही अंदाज
अनिल परबांच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ, परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला का दिली नाही, विरोधकांचा सवाल, मुख्यमंत्र्यांनी हक्कभंग केल्याचा आरोप, संध्याकाळपर्यंत निवेदन देऊ, अजित पवारांचं उत्तर























