Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 24 june2025 : Maharashtra News : ABP Majha
पुढील ५ दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस, तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज.
पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी, प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी, गडचिरोलीतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना.
नाशिकच्या गंगापूर धरणातून ६ हजार १६० क्यूसेक वेगानं विसर्ग सुरु, गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी.
नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्ररूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी, सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस, या भागातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला.
सिंधुदुर्गच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून मोटरसायकल स्वार वाहून गेला, त्यासोबत असलेला एक जण बचावला, पाण्याचा अंदाज न घेता पुलावरुन जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला.
पावसामुळे मेळघाटात हिरवाईने सृष्टी नटल्याने दुष्काळाचं सावट झाले दूर. निसर्गातील याच बदलाचा आनंद मेळघाटातील पशुपक्षी आणि प्राण्यांवर झाल्याचं दिसून येतंय. 'एबीपी माझा'चे प्रेक्षक अमोल पाटील यांनी टिपलेले हे काही सुंदर दृश्य.
रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असल्याची प्रशासनाची माहिती.
बीडच्या माजलगावमध्ये ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण, मात्र पावसाअभावी उर्वरीत भागातील पेरण्या रखडल्या.
All Shows

































