Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 23 june2025 : Maharashtra News : ABP Majha
यंदा आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदा यात्रा कालावधीत मास मटन विक्रीस बंद, सलग दहा दिवस पंढरपुरात मास मटनावर बंदी, वारकरी संप्रदायाच्या मागणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा.
लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार, आज पालखीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात असेल.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं दिवेघाट पार केला, 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी विक्रम हापसेंनी टिपले दिवे घाट पार करतानाची पालखीचे विहंगम ड्रोन दृश्य, तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सासवडमध्ये असणार.
संत मुक्ताईंच्या पालखीच बीड शहरात आगमन, मोठ्या उत्साहात भाविकांकडून पालखीच स्वागत, बीड हे संत मुक्ताईंचे आजोळ असल्याने संत मुक्ताईची पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी.
यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर २५० बसेसचं नियोजन, जिल्ह्यातील १२ ते १५ हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता, २ जुलैपासून प्रत्येक आगारातून बससेवा सुरू होणार.
चंद्रभागेत बुडणाऱ्या ६ भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं, स्नानाला जाणाऱ्या भाविकांना अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत होते.
विदर्भातील शाळा पहिल्याच दिवशी राहण्याची शक्यता, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा आज शाळा न उघडण्याचा निर्णय, प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भातील सर्व शाळा राहणार बंद.
मालवणमधील राजकोट किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील चबुतराच्या दुरुस्ती कामांसाठी प्रशासनाचा निर्णय.
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद. नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय.
वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पूल तब्बल बारा वर्षे रखडला, १२ वर्ष रखडलेल्या पुलाचं उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्यांना नैतिक अधिकारच नाही, खासदार अमर काळे यांची बोचरी टीका, लवकरात लवकर पूल सुरू करावा, काळे यांची मागणी.
All Shows

































