(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhone : iPhone लाँच होतो , तेव्हा फोनच्या स्क्रिनवर 9.41 वेळ का असते? काय आहे यामागील कारण?
आयफोनमधील एका गोष्टीचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? आयफोनच्या प्रत्येक फोनमध्ये सकाळचे 9.41 मिनिटे वेळच का दिसते? यामागील नेमके कारण काय आहे? जाणून घेऊया.
iPhone : नुकतेच Apple कंपनीने आयफोन 15 सिरीज लाँच केली आहे. बहुप्रतिक्षित असलेला हा फोन लाँच झाल्यानंतर सोशल मिडीयावर या फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सोबत फोनच्या फिचर्स देखील मोठी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अनेकांनी सोशल मीडिया अकाउंटवर नवीन आलेल्या सीरिजचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या आयफोनमधील एका गोष्टीचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? आयफोनच्या प्रत्येक फोनमध्ये सकाळचे 9.41 मिनिटे वेळच का दिसते? यामागील नेमके कारण काय आहे? जाणून घेऊया काय आहे 9.41 मिनिटांच्या वेळेची कहाणी.
तर ही गोष्ट सुरू होते 2007 पासून. ज्यावेळी पहिला आयफोन लाँच झाला. त्यावेळी तो पहिला आयफोन स्टीव्ह जॉब्स लाँच करणार होते. लाँच करण्याच्या वेळी त्यांना असे वाटत होते की, ज्या वेळेस फोन लाँच होत आहे. तिच वेळ त्या फोनमध्ये दिसावी. तर पहिला आयफोन ज्या वेळी लाँच झाला ती वेळ होती सकाळचे 9.41 त्यामुळे आयफोनच्या प्रत्येक फोनवर सकाळचे 9.41 अशी वेळ दिसते.
iPhone 15 सिरिजची किंमत
भारतात iPhone15 Pro Max च्या 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये असेल, जी 2 लाख रुपयांपेक्षा फक्त 100 रुपये कमी आहे. तर भारतात Iphone 15 Pro आणि Iphone Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,59,900 रुपये असेल आणि ती 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. Apple ने आपली Iphone 15 सीरीज जागतिक बाजारात लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या लॉंच इव्हेंटमध्ये 4 नवीन IPhones Iphone 15, Iphone 15 Plus, Iphone 15 Pro आणि Iphone 15 Pro Max लॉंच केले आहेत. Iphone 15 भारतातील 2 लाख रुपयांच्या किंमतीवरून केवळ 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
भारतात आयफोन 15 कधीपासून उपलब्ध होणार? (When Will Iphone 15 Be Available In India?)
ॲपलच्या आयफोन 15 सीरिजची प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारतात आयफोन 15 सीरिज 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. मुंबई किंवा दिल्ली या शहरांमधील ॲपल स्टोरमध्ये जाऊन तुम्ही आयफोन 15 सीरिज खरेदी करु शकता. इतर शहरांमधील लोक आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन ॲपल कंपनीच्या ऑनलाईन साईटवरुन बूक करू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या