Cyber Security : ऑनलाइन स्कॅमपासून सावध राहण्याकरता 'या' काही ट्रिक फाॅलो करा , जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिकबद्दल
स्कॅमर लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या खोट्या वेबसाईट तयार करून सामान्य लोकांना फसवण्याचे काम करत आहेत.
Cyber Security : आजकाल लोकांमध्ये फोन वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र याच माध्यमातून लोकांना फसवण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे डिजिटल युग फार पुढे गेले आहे. याचा जेवढा फायदा लोकांना होतो तेवढेच नुकसान देखील होते. आजकाल स्कॅमर्स (Scammer) प्रत्येक वेबसाईटसवर लोकांना फसवण्यासाठी जाळे तयार करतात. आत्तापर्यंत हे लोक तुम्हाला तुमच्याच प्रिय व्यक्तीच्या आवाजात फोन करून तुमच्याकडून पैसे घेत होते.
मात्र आता हे स्कॅमर लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या खोट्या वेबसाईट तयार करून सामान्य लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. या बनावट वेबसाईटवरून तुम्ही काहीही खरेदी केले तरी तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. याच्या मदतीने ते तुमचे संपूर्ण बँक खाते पूर्णपणे रिकामे करू शकतात. तुम्हाला जर अशा बनावट बेवसाईटबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या काही सोप्या ट्रिक तुमच्या कामी येऊ शकतात.
वेबसाईटचा अॅड्रेस बार चेक करा (Check The Address Bar Of The Website)
ज्या वेबसाईटवर जात आहात त्याचा अॅड्रेस बार नेहमी तपासा. त्या वेबसाईटमध्ये जर https असेल तर ती वेबसाईट सुरक्षित आहे. तसेच संबंधित वेबसाईटवरील स्पेलिंग प्रत्येक वेळी तपासा. डोमेन एक्सटेंशन तपासणे देखील गरजेचे आहे. वेबसाईटमध्ये .com , .net , .org असणे गरजेचे आहे.
वेबसाईटवरील व्याकरण तपासा (Check The Grammar On The Website)
जर तुम्हाला वेबसाईटवर कोणती व्याकरणाची चूक किंवा चूकीचे स्पेलिंग तसेच अर्धवट URL दिसले तर ती वेबसाईट खोटी आहे.
About Us आणि Contact Us विभाग तपासा (Check The About Us And Contact Us Sections)
एखादी वेबसाईट खरी आहे की नाही हे तपासण्याकरता तुम्हाला त्या वेबसाईटच्या About Us आणि Contact Us विभागात जावे लागेल. येथून तुम्हाला खरी माहिती मिळू शकते. तुम्ही LinkedIn किंवा इतर सोशल मीडिया प्रोफाइल देखील तपासू शकता.
पाॅप-अप अॅड्स
वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला जर अनेक पाॅप-अप अॅड्स दिसत असतील तर त्यावर चुकुनही क्लिक करू नका. तुम्ही अशा अॅडवर क्लिक केले तर तुम्हाला फसवले जाऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या