एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं होणार सोपं, जाणून घ्या स्टेप्स

आता तुम्हाला नंबरशिवाय देखील लोकांना Whatsapp ला अॅड करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला केवळ QR Code स्कॅन करावं लागणार आहे. या पद्धतीमुळे तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचू शकणार आहेत.

WhatsApps QR code feature to add people : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फीचर्स घेऊन येत असतं. भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 550 दशलक्षहून अधिक लोक WhatsApp वापरतात. आजच्या काळात मित्र, कुटुंब आणि इतर लोकांशी कनेक्ट राहण्यात WhatsApp खूप महत्त्वाची भूमिका बजावते. याद्वारे हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीशीही आपण सर्वजण जोडलेले असतो. 

सुरूवातीस कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधायचा म्हटलं की, एकमेकांना नंबर शेअर करावे लागत होते. पण आता तुम्हाला नंबरशिवाय देखील लोकांना Whatsapp ला अॅड करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला केवळ QR Code स्कॅन करावं लागणार आहे. या पद्धतीमुळे तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचू शकणार आहेत. Linkedin Device मध्ये तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

काय आहे प्रोसेस? 

तुमचे WhatsApp ओपन करा. स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन पाॅईंट्सवर क्लिक करा. आता ड्रॉप-डाउन मेनूमधून, 'सेटिंग्ज' वर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. आता तुमच्या प्रोफाइल पेजच्या उजव्या बाजूला, QR कोड आयकॉनवर टॅप करा आणि नंतर तुम्हाला Scan QR  Code हा पर्याय दिसेल. तो फोनने स्कॅन करा. तुम्ही स्कॅन करताच, तुम्हाला एक नवीन संपर्क दिसेल,  तुम्ही तो लगेच सेव्ह करू शकता.

व्हॉट्सअॅपवर HD व्हिडीओ शेअर करता येणार

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपमध्ये कंपनीने लोकांना एचडी फोटो शेअर करण्याचे फीचर दिले आहे. लोकांना टप्प्याटप्प्याने हे अपडेट मिळत आहेत. लवकरच यूजर्सना HD क्वालिटीचे व्हिडीओ शेअर करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. आता हे फीचर देखील लाईव्ह होऊ लागले आहे. 9to5Mac च्या रिपोर्टनुसार, काही यूजर्सना HD व्हिडीओ शेअर करण्याचा पर्याय मिळू लागला आहे. 

या 2 पर्यायांमध्ये व्हिडीओ शेअर करता येईल

व्हॉट्सअॅप अपडेटनंतर, अॅपमध्ये व्हिडीओ शेअर करताना, यूजर्सना 2 पर्याय मिळतील ज्यामध्ये एक स्टॅंडर्ड आणि दुसरा एचडी व्हिडीओ क्वालिटीचा असेल. यूजर्स आपल्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकतात. तुम्ही HD पर्याय निवडल्यास, तुमचे इंटरनेट सामान्यपेक्षा जास्त वेळ घेईल. त्यामुळे आवश्यकतेनुसार पर्यायांमध्ये स्विच करा.

तर स्टॅंडर्ड व्हर्जन निवडल्यानंतर WhatsApp व्हिडीओवर प्रोसेस करते आणि 480p रिझोल्यूशनमध्ये पाठवते. तुमचे इंटरनेट कनेक्शन कमी असताना हा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकतो. एचडी पर्यायामध्ये, कंपनी 720p रिझोल्यूशनमध्ये व्हिडीओ पाठवते जे अद्याप 1080p किंवा 4K पेक्षा खूपच कमी आहे परंतु त्याची क्वालिटी स्टॅंंडर्डच्या तुलनेत चांगली वाढते.   

इतर महत्वाच्या बातम्या

Smartphone : 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Zero 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 'ही' आहे किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Embed widget