WhatsApp New Features : आता इमोजी, मेसेजऐवजी 'या' हटके फीचरद्वारे व्हॉट्सअॅप स्टेटसला रिप्लाय करा, काय आहे नवीन फीचर?
WhatsApp एका नवीन फीचर्सवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना अवतार वापरून स्टेटस अपडेटला (Update) उत्तर देऊ शकेल. हे फीचर चाचणी टप्प्यात आहे .
WhatsApp Upcoming Feature : लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी नेहमीच अपडेटेड फीचर्स घेऊन येत असतं. भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 550 दशलक्षहून अधिक लोक WhatsApp वापरतात. आता पुन्हा एकदा मेटा एका नवीन फीचरवर काम करत आहे. लवकरच तुम्ही अवतारच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप स्टेटसलाही उत्तर देऊ शकाल. एवढे दिवस केवळ इमोजी आणि मेसेजद्वारे स्टेटसला रिप्लाय देऊ शकत होतो. पण आता व्हॉट्सअॅप सध्या युजर्सना आठ अवतारांचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. इमोजीऐवजी आता अवतार वापरुन स्टेटसला रिप्लाय करता येणार आहे.
व्हॉट्सअॅपकडून एचडी व्हिडीओ शेअरिंग फीचर सादर
अॅपवर फोटो शेअरिंग सुधारण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर जोडले आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आपले HD फोटो शेअर करु शकणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये ही माहिती दिली. आतापर्यंत अॅपमध्ये कॉम्प्रेस केलेला फोटो शेअर केला जात होता, परंतु आता तुम्ही त्याची क्वॉलिटी बदलू शकता. हे नवीन फीचर टप्प्याटप्प्याने सादर केलं जाणार आहे. युजर्स लवकरच या फिचरचा लाभ घेऊ शकतील.
व्हॉट्सअॅपवर एचडी फोटो कसा पाठवायचा?
- तुम्हाला व्हॉट्सअॅपवरुन कोणालाही एचडी फोटो शेअर करायचा असेल तर त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी तुम्हाला ज्या व्यक्तीला HD फोटो पाठवायचा आहे तो चॅट बॉक्स ओपन करा.
- यानंतर, मेसेज बारच्या बाजूला असलेल्या प्लस आयकॉनवर टॅप करा आणि नंतर फोटो आणि व्हिडीओ लायब्ररी ऑप्शनवर टॅप करा.
- त्यानंतर समोरच्या व्यक्तीला जो फोटो पाठवायचा आहे तो निवडा.
- फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर HD चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि फोटो पाठवा.
WhatsApp 'या' फीचरवर करत आहे काम
WhatsApp अनेक फीचरवर काम करत आहे. त्यामध्ये यूजरनेम, अॅडमिन रिव्ह्यू, Passkey, ई-मेल लिंक इत्यादीचा समावेश आहे. युजरनेम फीचर सुरु केल्यानंतर, प्रत्येकाला स्वतःचे वेगळे युजरनेम सेट करावे लागेल, जसे सध्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरमध्ये आहे. युजरनेमच्या मदतीने तुम्ही इतरांनाही तुमच्या व्हॉट्सअॅपवर जोडू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा इतरांना नंबर देण्याची गरज नाही. WhatsApp व्यतिरिक्त, Meta ने थ्रेड्ससाठी नवीन अपडेट्स देखील जारी केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Twitter New Feature : एलॉन मस्कने 'X' वर सुरु केले जॉब सर्चिंग फीचर; Linkedin शी करणार थेट स्पर्धा