WhatsApp वर चॅटिंगशिवाय करता येणार 'हे' काम, 'या' युजर्सना मिळणार नवं फिचर
WhatsApp : व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. त्यामुळे तुम्ही जर WhatsApp चे बीटा व्हर्जन वापरणाऱ्यांना हे नवीन फिचर वापरता येणार आहे.
मुंबई : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपने (Whatsapp) नुकतेच हे नवं फिचर जारी केलं आहे. सध्या हे फीचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. बीटा व्हर्जनमध्ये याची चाचणी झाल्यानंतर हे फिचर येत्या काळात ते सर्व युजर्सना वापरता येईल. तसेच या नव्या फिचरमुळे तुम्हाला जवळपासच्या लोकांना फाईल देखील ट्रान्सफर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला यामध्ये शेअर फाइल्सचा पर्याय मिळेल. तसेच तुम्हाला यामध्ये जवळपासच्या लोकांना फाईल शेअर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतो.
फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी दोन्ही युजर्सना म्हणजेच जो फाईल ट्रान्सफर करतोय त्याला आणि जो फाईल ट्रान्सफर करुन घेतोय त्याला हा पर्याय सुरु ठेवावा लागेल. फाइल निवडल्यानंतर, युजर्सनाच्या मोबाईलवर त्याची रिक्वेस्ट येईल. ती एक्सेप्ट केल्यानंतर फाईल ट्रान्सफरची प्रक्रिया सुरु होईल. सध्या हे फीचर बीटा स्टेजमध्ये आहे. त्यामुळे या व्हर्जनमध्ये फाईल ट्रान्सफर करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
कंपनी आधी देत होती हा पर्याय
WhatsApp आधीच युजर्सना चॅटद्वारे 2GB पर्यंत फाइल्स ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. पण यासाठी हायस्पीड डेटा आवश्यक असतो. तसेच हा डेटा वापरताना फाईल ही फाईल डाऊनलोड करताना काही तास लागतात. युजर्सची ही अडचण दूर करण्यासाठी या नवा पर्याय अॅपमध्ये आणण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आलाय.
नवीन फाइल ट्रान्सफर फीचर अंतर्गत पाठवलेली फाईल देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल आणि तुमच्याशिवाय कोणीही ती पाहू शकणार नाही. तुमच्या ज्यांचा नंबर सेव नाही अशा लोकांना तुम्ही फाईल ट्रान्सफर जेव्हा कराल, तेव्हा तुमचा मोबाईल नंबरही त्यांना दिसणार नाही. याशिवाय कंपनी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. जे हळूहळू यूजर्ससाठी उपलब्ध होतील.
व्हॉट्सअॅपमध्ये आलं नवं फिचर
व्हॉट्सअॅपच्या आणखी नवीन फिचरचे नाव अॅप अपडेट्स असं आहे. हे फिचर सध्या रोलिंग आऊट स्टेटसमध्येच आहे. या फीचरद्वारे यूजर्सना अॅपच्या लेटेस्ट अपडेटची सूचना आणि व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्येच ऑटो अपडेटचा पर्याय मिळेल. यामुळे व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट शोधण्यासाठी यूजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाण्याची गरज भासणार नाही.WhatsApp ने सध्या हे अपडेट फक्त निवडक बीटा युजर्ससाठी आणले आहे. बीटा युजर्स बीटा व्हॉट्सअॅपच्या या कंपनीच्या नवीन फिचर्सची चाचणी करतात आणि त्यामध्ये काही कमतरता असल्याच त्याविषयी कंपनीला फीडबॅक देतात. उणीवा दूर केल्यानंतर, कंपनी हळूहळू सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील हे फिचर सुरु करते.
हेही वाचा :
Whatsapp Bug : तुमचंही whatsapp थेट Logout होतंय का? दुर्लक्ष करु नका नाहीतर...