Whatsapp Bug : तुमचंही whatsapp थेट Logout होतंय का? दुर्लक्ष करु नका नाहीतर...
Whatsapp Bug : तुम्ही जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण व्हॉट्सअॅपमध्ये एक bug आल्याची माहिती समोर आली (Cyber Crime) आहे. जे whatsapp युजर्ससाठी धोक्याचं आहे.
Whatsapp Bug : तुम्ही जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर (Whatsapp) तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण व्हॉट्सअॅपमध्ये एक bug आल्याची माहिती समोर आली (Cyber Crime) आहे. जे whatsapp युजर्ससाठी धोक्याचं आहे. या बगमुळे व्हॉट्सअॅप अकाऊंट आपोआप लॉगआऊट होते. त्यामुळे अनेक युजर्सला त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या PC किंला लॅपटॉपवर (Whatsapp Bug) जर तुम्ही whatsapp Web वापरत असाल तर त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. सोशल मीडिया युजर्स अनेक व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉग आऊट झाल्याच्या तक्रारी करत आहेत. अशावेळी नेमकं काय करायचं? पाहूयात...
काय आहे तक्रारी?
व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगआऊटच्या सर्वात जास्त तक्रारी डेस्कटॉपवर येत आहेत. सामान्यत: व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉग आऊट केल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यासाठी 6 अंकी ओटीपी आवश्यक असतो. मात्र, बगमुळे तसे होत नाही. अशा परिस्थितीत सुरक्षेला मोठा धोका मानला जात आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि वेब युजर्स या बगबद्दल तक्रार करत आहेत.
स्वत:चं संरक्षण कसं कराल?
व्हॉट्सअॅप सपोर्ट पेजनुसार, हा सुरक्षेचा मुद्दा आहे. सध्या हा बग टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आपण आपल्या सुरक्षिततेसाठी two factor authentication ऑन करुन ठेवा.
Two factor authentication कसं ऑन कराल?
-सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर सेटिंग्स ऑप्शनवर टॅप करा.
-त्यानंतर तुम्हाला अकाउंट ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
-यानंतर तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑप्शनवर टॅप करावं लागेल.
-यानंतर खाते सुरक्षित करण्यासाठी 6 अंकी कोड टाकावा लागतो.
-यासोबतच ईमेल टाकावा लागेल आणि ईमेल व्हेरिफाय करावा लागेल.
-यानंतर जेव्हा तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगआऊट होईल तेव्हा सिक्युरिटी पिन टाकावा लागेल.
App's Report पर्याय उपलब्ध
टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ॲड करण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप मध्ये लॉगिन करताना तुमच्या पासवर्ड बरोबर एक कोड टाकणे गरजेचे असते. ही एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन लेयर्स स्कॅमरला तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यापासून रोखू शकते. तुमचे सगळे सोशल मीडिया ॲप्स कायम अपडेट ठेवा. व्हॉट्सॲप अपडेट ठेवा. तुम्हाला जर एखादा संशयास्पद मेसेज आढळला तर तो व्हॉट्सॲपचा स्पॅम रिपोर्टिंग क्रमांक +44 7598 505694 यावर फॉरवर्ड करा. यामध्ये असणारे App's Report ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता.
इतर महत्वाची बातमी-
X New feature : आता 'एक्स'वर करु शकणार ऑडिओ- व्हिडीओ कॉल; एक्सच्या नव्या फिचरचा फायदा कोणाला?