एक्स्प्लोर

WhatsApp New Feature : ज्याच्यासाठी ठेवलंय स्टेटस त्याला आता पाहावंच लागणार! फक्त करावं लागेल 'हे' काम

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲपवर सध्या 24 तास स्टेटस दिसत आहे. अनेक वेळा लोक एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी स्टेटस टाकतात.

WhatsApp New Feature : सोशल मीडियावरील (Social Media) व्हॉट्सअप (Whatsapp) हे सर्वांचं लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. जगभरातील तब्बल 200 कोटींहून अधिक लोक या अॅपचा वापर करतात. आपल्या यूजर्सच्या सोयीसाठीही व्हॉट्सअप सतत आपल्या अॅपमध्ये नवीन बदल घेऊन येत असतात. आता व्हॉट्सअपने स्टेटस सेक्शनमध्ये देखील एक नवीन आणि भन्नाट फीचर घेऊन येत आहे. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

व्हॉट्सॲप आपल्या ॲपमध्ये ग्राहकांना सतत नवीन फीचर्स देत असतं. काही फीचर्स हे यूजर्सची प्रायव्हसी मेंटेन करतात तर, काही सुरक्षिततेची संबंधित असतात. तर, काही फीचर्स यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी असतात. व्हॉट्सॲप आता स्टेटस सेक्शनमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. या फीचरमुळे तुम्हाला तुम्ही ज्या यूजर्ससाठी स्टेटस पोस्ट केलं आहे त्यांना तुमच्या स्टेटसची माहिती लगेच मिळेल. 

आता यूजर्सला वाट पाहावी लागणार नाही

व्हॉट्सॲपवर सध्या फक्त 24 तासांसाठी तुमचं स्टेटस अॅक्टिव्ह असतं. अनेकदा आपण खास व्यक्तीसाठी स्टेटस ठेवतो. पण, त्या व्यक्तीने स्टेटट पाहिलं का हे पाहण्यासाठी आपण वारंवार स्टेटट चेक करतो. अशा वेळी 24 तासांनंतरही त्या व्यक्तीने स्टेटस पाहिलं नाही तर निराशा होते. व्हॉट्सअपने याच समस्येवर उपाय शोधला आहे. आता ज्या व्यक्तीसाठी व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केले गेले आहे त्याने ते पाहिले की नाही याची वाट पाहावी लागणार नाही. 

कंपनीने संपर्कांचा उल्लेख जाहीर केला

खरंतर, व्हॉट्सॲपने आता स्टेटसमध्ये कॉन्टॅक्टसही मेंशन करण्याचा पर्याय दिला आहे. कंपनी खूप दिवसांपासून या फीचरवर काम करत होती. आता कंपनीने हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख कराल त्याला लगेच तुमच्या स्टेटसचं नोटिफिकेशन मिळेल. 

व्हॉट्सॲपने आपल्या नवीन फीचरला स्टेटस मेन्शन (Status Mention) असं नाव दिलं आहे. व्हॉट्सॲप मॉनिटरिंग वेबसाईट व्हॉट्सॲपच्या मते, व्हॉट्सॲपने नुकतेच व्हॉट्सॲप अँड्रॉईड 2.24.6.19 बीटा अपडेटमध्ये हे नवीन फीचर आणले आहे. जर तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करून इंस्टॉल करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या :

Mobile Safety Tips : तुमच्या फोनमधून फोटो आणि व्हिडीओ डिलीट झालेत? चिंता करू नका, 'या' पद्धतीने झटक्यात सर्व डेटा परत मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal  Nashik : मी घाबरुन उमेदवारी मागे घेतली नाही, मी कोणालाही घाबरत नाही : छगन भुजबळHello Mic Testing Ajit Pawar : कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका - अजित पवारVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 28 एप्रिल 2024ABP Majha Headlines : 6 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
CSK vs SRH Live Score IPL 2024: सनरायजर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने, धोनी मॅजिकची चेन्नईला आशा
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
Embed widget