Twitter: इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात होणार लढत! ट्विटरवर लाईव्ह पाहता येणार सामना
Elon Musk vs Mark Zuckerberg: 85 किलो वजनी मस्क 75 किलो वजनी झुकरबर्ग यांच्या खराखुरी लढत पाहायला मिळणार आहे. इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांची लढत ट्विटरवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
Zuckerberg vs Musk Fight: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांमध्ये होणारी लढत सध्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, म्हणजेच ट्विटरवर ही लढत थेट प्रसारित केली जाईल, असं मस्क यांनी जाहीर केलं आहे. एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात मिस्क्ड मार्शल आर्टिस्ट फाइट (MMA Fight) होणार आहे. या फाईटकडे सर्वात बहुप्रतिक्षित लढत म्हणून पाहिलं जात आहे. या केज फाईटकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून ती कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मस्क आणि झुकरबर्ग यांच्यात महामुकाबला
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्यात जगातील सर्वात मोठ्या ॲम्फीथिएटरमध्ये केज फाईट रंगणार आहे. Tmz स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, या लढतीसाठी इटालियन सरकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला भेटले आहेत. हा सामना जगातील सर्वात मोठ्या ॲम्फी थिएटरमध्ये म्हणजेच इटलीतील कोलोसिअम (Colosseum) या मैदानात होणार आहे. ट्विटर आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सामना पाहण्यासाठी कोट्यवधी लोक उत्सुक
लाईव्ह स्ट्रिममधून मिळालेली रक्कम ही संस्थांच्या चॅरिटीमध्ये जाईल, असं देखील मस्क एका ट्विटमध्ये म्हणाले. त्यांच्या पोस्टला 3.1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि एका तासाच्या आत मोजत आहेत. हा सामना बघण्यासाठी मी तिथे असेन, अशी प्रतिक्रिया एकाने कमेंटमध्ये दिली. तर, लढतीची तारीख कळवाल तर सुट्टी घेऊन सामना पाहायला येऊ शकू, असं दुसऱ्या एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे.
Zuck v Musk fight will be live-streamed on 𝕏.
— Elon Musk (@elonmusk) August 6, 2023
All proceeds will go to charity for veterans.
पुरुषांना युद्ध आवडतं - मस्क
मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं की, या सामन्यासाठी मी दिवसभर वजन उचलून लढण्याची तयारी करत आहे. जेव्हा X वरील एका वापरकर्त्याने मस्क यांना लढाईचं कारण विचारलं तर, 'पुरुषांना युद्ध आवडतं' असं ते म्हणाले.
Am lifting weights throughout the day, preparing for the fight.
— Elon Musk (@elonmusk) August 6, 2023
Don’t have time to work out, so I just bring them to work.
जूनमध्येच झाला लढतीचा निर्णय
जूनमध्ये झुकेरबर्ग यांनी मस्कशी लढण्यासाठी होकार दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून एलॉन मस्क यांनी ट्विट केलं की, ते केज फाईटमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहे. यानंतर मेटाचे सीईओ झुकरबर्ग यांनी टेस्लाचे सीईओ मस्क यांना लोकेशन पाठवण्यास सांगितलं. तेव्हापासून सोशल मीडियावर लोक सतत दोघांच्या लढतीची चर्चा सुरु आहेत आणि प्रत्येक जण या लढतीसाठी उत्सुक आहे.
दोघांपैकी कोण-किती ताकदवान?
गेल्या महिन्यातच, झुकरबर्ग यांनी त्यांच्या जिउ-जित्सू प्रवासात ब्लू बेल्ट मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग जिउ-जित्सूचे खेळाडू आहेत. त्यांनी आपले प्रशिक्षक डेव्ह कॅमारिलो यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता आणि त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याबद्दल उल्लेख केला होता.
ट्विटर आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहेत तर, मार्क झुकरबर्ग 5 फूट 8 इंच उंच आहेत. मस्क यांच्याकडे लांबीच्या बाबतीत झुकतं माप आहे. मस्क यांना केवळ उंचीचा फायदा नाही, तर त्यांचं वजनही जास्त आहे. मेटाचे सीईओ देखील मार्शल आर्ट्सचे चॅम्पियन आहेत. काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्ग यांनी एका स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिथे त्यांनी त्यांच्या जिउ-जित्सू कौशल्य दाखवली. झुकरबर्ग यांनी सिलिकॉन व्हॅली स्पर्धेत पहिलं सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं.
हेही वाचा: