एक्स्प्लोर

Twitter New Feature : एलॉन मस्कने 'X' वर सुरु केले जॉब सर्चिंग फीचर; Linkedin शी करणार थेट स्पर्धा

एलॉन मस्क ट्विटरमध्ये एक भन्नाट फिचर सुरू करणार आहेत. आता लवकरच LinkedIn प्रमाणे ट्विटर देखील नोकरी शोधता येणार आहे. X हँडलवर युजर्ससाठी जॉब सर्चचे फीचर सुरू केले जात आहे.

Elon Musk's Introduces Job Listing Feature : एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर विकत घेतल्यापासून, प्लॅटफॉर्ममध्ये सतत बदल होत आहेत. एलॉन मस्कने ट्विटरचे स्वरुप बदलले आहे. यूजर्ससाठी एलॉन मस्क कायमच नवनवीन अपडेट करत असतात. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क ट्विटरमध्ये एक भन्नाट फिचर सुरु करणार आहेत. आता लवकरच LinkedIn प्रमाणे ट्विटर देखील नोकरी शोधता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, X हँडलवर युजर्ससाठी जॉब सर्चचे फीचर सुरु केले जात आहे. एक्स हॅण्डलवर जॉब सर्च फीचर आणण्याचा इशाराही एलॉन मस्ककडून मिळाला आहे. लवकरच या प्लॅटफॉर्मवर नोकऱ्या शोधण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. एलॉन मस्कच्या AI कंपनीने @XHiring वर जॉब लिस्ट पोस्ट करणे सुरु केले आहे. तथापि, ते सध्या वेबवर उपलब्ध आहे आणि केवळ यूएससाठी व्हिजिबल आहे. गेल्या महिन्यात, निमा ओवजी नावाच्या अॅप संशोधकाने जॉब लिस्टिंग फीचरसंदर्भात एक स्क्रीनशॉट शेअर केला. X हँडल ट्विटर हायरिंगच्या नावाने हे फीचर देत असल्याचे या स्क्रीनशॉटवरुन उघड झाले. कंपनीकडून हे मोफत फीचर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

X Premium New Features काय आहे?

पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करु शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करु शकतात. याशिवाय यूजर्स आपल्या टाईमलाईनमध्ये येणारे व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह देखील करु शकतात. यासाठी त्यांना डाऊनलोडचा पर्याय मिळेल. जर पेड यूजर्सना असे वाटत असेल की, त्यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ कोणीही डाऊनलोड करु शकत नाही, तर यासाठी त्यांना व्हिडीओचा डाऊनलोड पर्याय डिसेबल किंवा अनेबल करण्याचा पर्याय असेल. याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करु शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वॉलिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे. 

अशा पद्धतीने होणार X (Twitter) व्हेरिफिकेशन

आता ट्विटरवर व्हेरिफिकेशन करणं अधिक सोप होणार आहे. याकरता तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट हे डाॅक्युमेंट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. ट्विटरने याबाबत  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच ही सुविधा येणार असं सांगण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

AI Voice Clone Fraud : AI च्या मदतीने ओळखीच्या व्यक्तींचा आवाज काढून फसवणूक, स्कॅम टाळण्यासाठी काय करावे?

महत्त्वाच्या बातम्या

विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget