Elon Musk on Twitter : ट्विटरच्या 'X' नंतर पुन्हा मोठा बदल; आता 'Retweet' ऐवजी 'Repost' येणार
Elon Musk on Twitter : नुकतेच ट्विटरने आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले होते. यात ब्लू बर्डच्या जागी X हे चिन्ह आहे.
Elon Musk on Twitter : टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (Space X) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच ट्विटरचे नाव बदलून एक्स (X) केले आहे. अनेक यूजर्स ट्विटरच्या ब्लू बर्डला खूप मिस करत आहेत. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक मोठा बदल जाहीर केला आहे. ट्विटरचे लोकप्रिय ट्विट (Tweet) बटण आता पोस्ट (Post) केले आहे. त्याच वेळी, यूजर्स आता रीट्विट (Retweet) च्या जागी (Repost) हा पर्याय वापरू शकणार आहेत. एक्स न्यूज डेलीनुसार, नवा बदल नुकताच Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे.
Twitter’s signature “Retweet” is now replaced with “Repost” button.
— Fact Protocol (@FactProtocol) August 2, 2023
The end of an Era!#Twitter #X pic.twitter.com/iP7Ox2LVxQ
एलॉन मस्क यांनी नुकताच हा बदल ट्विटरवर केला आहे. त्यामुळे नवीन बदलानुसार आता ट्विटरचा वापर करणाऱ्या यूजर्सना Retweet च्या जागी Repost हे बटण दिसणार आहे. सध्या हा नवीन बदल Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला आहे.
ट्विटरपासून एक्सपर्यंतचा प्रवास...
गेल्या सोमवारी, ट्विटरने आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले होते. यात ब्लू बर्डच्या जागी X हे चिन्ह आहे. नवीन लोगोमध्ये काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा X आहे. मस्कने पोस्ट्सच्या सीरिजमध्ये ट्विटरचे रीब्रँड करण्याची योजना जाहीर केल्यानंतर हा बदल झाला आहे. तेव्हा त्यांनी ट्विटरच्या ब्लू बर्डबद्दल यूजर्सना कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी ट्विटरची ब्लू चिमणी काढण्यात आली आणि त्या जागी एक्स (X) हे चिन्ह आलं.
महत्त्वाच्या बातम्या :
YouTube New Feature : यूट्यूब शॉर्ट्समध्ये लवकरच 'हे' नवीन फीचर येणार; 'ही' आहेत खास वैशिष्ट्य