(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुगलकडून नवीन AI मॉडेल जेमिनी 1.5 लॉन्च, आता अनेक अवघड कामे सहज होणार; भारतातही सेवा सुरू
Gemini 1.5 : गुगलने अतिशय अवघड कामे सहजपणे, बरेच तास कोडींग, इमेज प्रोसेसिंग यांसारखी कठीण कामे सोपी करण्यासाठी नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे.
Gemini 1.5 : गुगलने (Google) यूजर्ससाठी जेमिनी एडव्हान्सला लॉन्च केल्यानंतर आता पुढची जनरेशन AI मॉडेल जेमिनी 1.5 ची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जेमिनीची नवीन व्हर्जन कार्याच्या बाबतीत खूपच पुढे आहे. कंपनीच्या मते, जेमिनी 1.5 व्हर्जन लॉंग कोडिंग, कंटेंट डिटेल्स, फोटो इत्यादी अनेक कार्ये हाताळण्यास सोपे आहे. जेमिनी 1.5 हे मध्यम आकाराचे मल्टीमोडल मॉडेल आहे जे जेमिनी 1.0 प्रो आणि जेमिनी 1.0 अल्ट्रावर आधारित आहे.
जेमिनी 1.5 मॉडेल काय आहे?
Google च्या जेमिनी 1.5 ने नवीन 'Mixture of experts' आर्किटेक्चर सादर केले आहे. जे AI मॉडेल्सना अधिक सक्षम बनविण्यास मदत करते. थोडक्यात सांगायचं तर, गुगलने अतिशय अवघड कामे सहजपणे, बरेच तास कोडींग, इमेज प्रोसेसिंग यांसारखी कठीण कामे सोपी करण्यासाठी डिझाईन आणि ट्रेंड केला आहे.
Google च्या मते, जेमिनी 1.5 प्रो 1 मिलियन लोक हाताळू शकतात. यामुळे, हे नवीन मॉडेल त्याच्या जुन्या व्हर्जनपेक्षा त्याच्या मेमरीमध्ये अधिक गोष्टी लक्षात ठेवू शकते. कंपनीच्या मते, जेमिनी 1.5 प्रो हे जेमिनी 1.0 अल्ट्रा सारखेच चांगले आहे. Google ने म्हटले आहे की, ते पॉवरफुल AI मॉडेल्सशी संबंधित गोष्टींकडे सतत लक्ष देत आहे. जर कोणती अडचण निर्माण होत असेल तर नवीन फिल्टर सादर केले जाणार आहे. Google चे CEO सुंदर पिचाई यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटद्वारे जेमिनी 1.5 ची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये वर नमूद केलेल्या या सर्व वैशिष्ट्यांची माहिती देताना त्यांनी लिहिले की, डिसेंबरमध्ये आम्ही जेमिनी 1.0 प्रो लॉन्च केला आणि आज आम्ही जेमिनी 1.5 प्रो लॉन्च करत आहोत.
In December, we launched Gemini 1.0 Pro. Today, we're introducing Gemini 1.5 Pro! 🚀
— Sundar Pichai (@sundarpichai) February 15, 2024
This next-gen model uses a Mixture-of-Experts (MoE) approach for more efficient training & higher-quality responses. Gemini 1.5 Pro, our mid-sized model, will soon come standard with a… pic.twitter.com/m2BNufHd8C
सामान्य ग्राहकांसाठी ही सुविधा कधी सुरु होणार?
Gemini 1.5 Pro सध्या Google AI स्टुडिओ आणि Vertex AI च्या एंटरप्राइझ यूजर्ससाठी उपलब्ध आहे. जेमिनी 1.5 प्रो सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार संदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या, Google AI चे नियमित यूजर्स Gemini Advanced Chatbot ची विनामूल्य चाचणी वापरू शकतात, जे कोडींग, प्रतिमा तयार करणे यांसारखी कार्ये सहजपणे करू शकतात आणि Android स्मार्टफोन्सवर Google सहाय्यक देखील बदलू शकतात.
गुगलने भारतातही जेमिनी ॲप आणण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी हे ॲप फक्त अमेरिकेत उपलब्ध होते. Google iOS गॅजेट्समध्ये Google ॲप देखील अपडेट करत आहे, ज्यामुळे iPhone आणि iPads वापरणारे यूजर्स जेमिनी चॅटबॉट सेवा देखील वापरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :