Iphone Use Ban In Chin : चीनमध्ये आयफोनवर बंदी! नेमकं कारण काय? सरकारी कर्मचाऱ्यांना iPhone वापरण्यावर बंदी!
चीनने अॅपल आयफोनच्या वापरावर Iphone बंदी घातली आहे. सरकारी कार्यालये आणि कंपन्यामध्ये या फोनवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही आयफोन वापरू शकणार नाही.
Iphone Use Ban In Chin : चीनने अॅपल आयफोनच्या वापरावर Iphone बंदी घातली आहे. चीनमधील सरकारी कार्यालये आणि कंपन्यामध्ये या फोनवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही आयफोन वापरू शकणार नाही. चीनमधील सरकारी अधिकाऱ्यालयात काम करणारे लोक किंवा तेथील सामान्य लोकांना सरकारी ठिकाणी आयफोन वापरता येणार नाही. पण आयफोन सर्वात सुरक्षित मानला जात असताना त्याच्या वापरावर बंदी का घातली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे कारण?
एका रिपोर्टनुसार, आयफोन हा सगळ्यात सुरक्षित फोन मानला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून आयफोनच्या सुरक्षिततेबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. आयफोनवर जर कोणाची करडी नजर असेल तर आयफोन वापरणाऱ्याला यासंदर्भात माहिती मिळते. ही माहिती सामान्यांना मिळून नये म्हणून चीनने आयफोन बंद केले आहे. चीनला प्रत्येक नागरिकांवर नियंत्रण ठेवायचं आहे. शिवाय त्यांच्या सामाजिक हालचालींवरदेखील चीन नियंत्रण मिळवू पाहत आहे. सीसीटीव्ही पासून तर अनेक सुरक्षेच्या यंत्रणा चीनमध्ये मागील काही वर्षांपासून काम करत आहे. आपल्या देशात काम करणाऱ्यावर आपलं संपूर्ण नियंत्रण असावं, म्हणून चीनने आयफोनवर बंदी घातली आहे.
मागील काही वर्षांपासून चीन परदेशी टेक्नॉलॉजी आणि वस्तुचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन सरकारशी संबंधित कंपन्यांना स्थानिक सॉफ्टवेअरचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे.गेल्या महिन्याभरात चीनमध्ये अनेक सरकारी कंपन्या आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक ब्रँडची गॅजेट्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याआधी सप्टेंबरमध्ये चीनच्या काही मंत्रालये आणि सरकारी संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आयफोन न आणण्यास सांगितले होते. अॅपल चीनमध्ये आयफोन आणि इतर उपकरणांचे उत्पादन कमी करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच चीनच्या पिंडुओडुओ आणि ताओबाओ सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अॅपलच्या नवीन आयफोन 15 सीरिजवर मोठी सूट दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन त्यांच्या किरकोळ किमतीपेक्षा कमी किंमतीत चीनी युआन 900 (सुमारे10,229 रुपये) मध्ये विकले जात होते.
फॉक्सकॉनला भारतात 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची परवानगी
अॅपलची सर्वात मोठी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनला भारतात 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची परवानगी मिळाली आहे. यामुळे अॅपलच्या उत्पादनांसाठी चीनबाहेर मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करता येणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीला परवानगी मिळाल्याने देशात आयफोनचे उत्पादन वाढविणे शक्य होईल, असे सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-