Samsung Smart Ring : सॅमसंगची स्मार्ट रिंग चर्चेत; लहान अंगठी करणार AI सह हेल्थ ट्रॅकिंग, कसे असतील फिचर्स?
Samsung Smart Ring : सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट पार पडला त्यात सॅमसंगने भन्नट गॅजेट्स दाखवले. आपल्या सुजर्सला सॅमसंग कायम नवनवे गजेट्स देत असतात. याच इव्हेंटमध्ये Galaxy Ring दाखवण्यात आली.
Samsung Smart Ring : सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट पार पडला. (Samsung ) त्यात सॅमसंगने भन्नट गॅजेट्स दाखवले. आपल्या सुजर्सला सॅमसंग कायम नवनवे गजेट्स देत असतात. याच इव्हेंटमध्ये Galaxy Ring दाखवण्यात आली. या डिव्हाइसमध्ये कंपनीने अनेक अॅडव्हान्स फिचर्स दिले आहेत. या दोन्हीची सध्या टेक्नेसॅव्ही तरुणांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यात सॅमसंग रिंगची सगळ्यात जास्त चर्चा सुरु आहे. ही रिंग नेमकी कशी असेल? त्यात कोणते फिचर्स असतील? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सॅमसंगची दमदार स्मार्ट रिंग
सॅमसंगच्या या मेगा इव्हेंटपूर्वीच गॅलेक्सी रिंग चर्चेत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅलेक्सी रिंगबाबत लीक समोर येत होते. गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान कंपनीने या स्मार्ट रिंगची झलक दाखवली, पण त्याबद्दल अद्याप फारशी माहिती देण्यात आलेली नाही. सॅमसंग गॅलेक्सी रिंगमध्ये कंपनी बहुतेक AI आधारित फिचरचा वापर करेल. यात अनेक अॅडव्हान्स हेल्थ मॉनिटरिंग फिचर्स दिले जाऊ शकतात. युजर्सच्या आरोग्याशी संबंधित माहिती देतील. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या गॅलेक्सी रिंगमध्ये सॅमसंग हेल्थ अॅप वापरणार आहे. सॅमसंगने याला पॉवरफुल अँड अॅक्सेसिबल असे नाव दिले आहे. आहेगॅलेक्सी रिंग ही एक अशी अंगठी आहे जी सतत आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवेल, असं सॅमसंगनं दावा केला आहे.
Surprise. Here comes the Galaxy Ring😲 pic.twitter.com/KqhKKQ9Asz
— SamMobile - Samsung news! (@SamMobiles) January 17, 2024
Samsung गॅलेक्सी एस 24 सीरिज लाँच
गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये कंपनीने मोस्ट अवेटेड सीरिजSamsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra 5G हे तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले. तीनही स्मार्टफोनमध्ये कंपनीने जगभरात अॅडव्हान्स एआय फीचर्स दिले आहेत. मालिकेतील टॉप मॉडेल Samsung Galaxy S24 Ultra 5G मध्ये टायटॅनियम बॉडी आणि 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सीरिजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये अनेक एआय असिस्टंट आहेत. Samsung Galaxy S24 Ultra 5G मध्ये 12 जीबी रॅमसह 1 टीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.
Samsung गॅलेक्सी एस 24 सीरिज फिचर्स
या सीरिजची खासियत म्हणजे एआय फिचर्स देण्यात आले आहे. जे कॅमेरा, एडिटिंगसाठी जास्त चांगलं असणार आहे. फोन कॉलदरम्यान लाइव्ह ट्रान्सलेशन, ईमेल रायटिंग, स्मार्ट फोटो एडिटिंग अशा काही फिचर्सची माहिती लीकमध्ये समोर आली आहे. सॅमसंगने स्मार्टफोनची प्री-बुकिंग खूप आधीच सुरू केली होती. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन किंवा सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही फोनचे प्री-बुकिंग करू शकता. प्री-बुकिंग केले तर कंपनी तुम्हाला 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू आणि स्पेशल एडिशन फोन आणि सॅमसंग क्लब मेंबर होण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये कंपनी वेलकम वॉचर कंपनी ला 5,000 रुपयांपर्यंत देऊ शकते. मोबाइल फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी आता 1,999 रुपये मोजावे लागतील, जे रिफंडेबल आहे. डिव्हाईस बुक करण्यासाठी तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
इतर महत्वाची बातमी-