Nuclear batteries : नाण्यापेक्षा लहान आकार; चार्ज न करता 50 वर्षे टिकेल ही बॅटरी, मोबाईलमध्ये वापरली जाणार की नाही?
चीनच्या बीजिंगस्थित बीटाव्होल्ट कंपनीने अशी बॅटरी तयार केली आहे जी चार्जिंगशिवाय 50 वर्षांपर्यंत टिकू शकते. ही न्यूक्लिअर बॅटरी आहे. द इंडिपेंडंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
![Nuclear batteries : नाण्यापेक्षा लहान आकार; चार्ज न करता 50 वर्षे टिकेल ही बॅटरी, मोबाईलमध्ये वापरली जाणार की नाही? china firm claims its coin sized battery could generate 50 year electricity without charging Nuclear batteries : नाण्यापेक्षा लहान आकार; चार्ज न करता 50 वर्षे टिकेल ही बॅटरी, मोबाईलमध्ये वापरली जाणार की नाही?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/17/3a49f9211e58f7821150e3460cdc02ee1705494849346442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nuclear batteries : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या बॅटरी उपलब्ध (Nuclear batteries) आहे. बॅटरी किती तास काम करतात?, यावर बॅटरीची किंमत ठरत असते. मात्र एका नाण्याएवढी बॅटरी चार्जिंगशिवाय 50 वर्षांपर्यंत टिकू शकते, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर हे तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही. मात्र हे खरं आहे. चीनच्या बीजिंगस्थित बीटाव्होल्ट कंपनीने अशी बॅटरी तयार केली आहे जी चार्जिंगशिवाय 50 वर्षांपर्यंत टिकू शकते. ही न्यूक्लिअर बॅटरी आहे. द इंडिपेंडंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅटरीचा आकार नाण्यापेक्षा लहान आहे. अॅटॉमिक एनर्जी देणारी ही आतापर्यंतची सर्वात लहान बॅटरी आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
लहान ड्रोन आणि मायक्रो रोबोटमध्ये होऊ शकतो वापर
या बॅटरीची चाचणी पूर्ण झाली असून येत्या काळात ती स्मार्टफोन आणि ड्रोनसाठी तयार केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यापूर्वी कंपनीला आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्या लागतील. बीटाव्होल्टची अॅटॉमिक एनर्जी बॅटरी वैद्यकीय उपकरणे, एरोस्पेस, AI गॅजेट्स, मायक्रोप्रोसेसर, सेन्सर, लहान ड्रोन आणि मायक्रो रोबोटला एनर्जी देऊ शकते. ही बॅटरी AIच्या जगात क्रांती घडवून आणण्याचे काम करेल, असे कंपनीने म्हटले आहे. मोबाईलमध्ये ही बॅटरी वापरण्यात येणार की नाही यासंदर्भात अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे.
बॅटरी डाइमेंशन
डाइमेंशन बोलायचे झाले तर ते 15 x 15 x 5 मिलीमीटर आहे. ही बॅटरी न्यूक्लिअर आयसोटोप आणि डायमंड सेमीकंडक्टर्सच्या वेफर-पातळ थरांनी बनलेली आहे. सध्या ही बॅटरी 3 व्होल्टवर 100 मायक्रोवॅट वीज निर्मिती करते. मात्र, 2025 पर्यंत ती 1 वॅट पॉवरवर आणण्याचे कंपनीचा प्रयत्न आहे. या अणुऊर्जा बॅटरीची खास बाब म्हणजे त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मानवाचे नुकसान होत नाही, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
आग लागण्याचा किंवा बॅटरी फुटण्याचा धोका कमी
प्रत्यक्षात ही बॅटरी आइसोटोपमधून निघणाऱ्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करते. विसाव्य शतकात पहिल्यांदा ही संकल्पना विकसित करण्यात आली. चीन आपल्या चौदाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 2021-2025 पर्यंत अणुबॅटरी लहान करण्याच्या प्रयत्नात आहे. या बॅटरींचे लेयर्ड डिझाइन असते ज्यामुळे सडन फोर्सकडून आग लागण्याचा किंवा बॅटरी फुटण्याचा धोका नसतो. मायनस 60 ते 120 डिग्री तापमानात या बॅटरी आरामात काम करू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)