(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samsung AI Power TV : सॅमसंगने लाँच केला एआय पॉवर असलेला स्मार्ट टीव्ही; कसे आहेत फिचर्स?
सॅमसंगने आपला 2024 सालचा स्मार्ट टीव्ही लाइन-अप सादर केला आहे. यावेळी कंपनीने एआय वर चालणारे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने त्यांना वेगवेगळ्या स्क्रीन साइजमध्ये लाँच केले आहे
Samsung AI Power TV : सॅमसंगने आपला 2024 सालचा स्मार्ट टीव्ही ( Samsung AI TV) लाइन-अप सादर केला आहे. यावेळी कंपनीने एआयवर चालणारे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने त्यांना वेगवेगळ्या स्क्रीन साइजमध्ये लाँच केले आहे. यासोबतच ब्रँडने transparent डिस्प्ले दाखवला आहे. यामध्ये मायक्रो एलईडी चिप्सचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने 8K रिझोल्यूशनअसलेला प्रोजेक्टर लाँच केला आहे. हा प्रोजेक्टर वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येतो. सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्हीमध्ये कंपनीने अनेक फीचर्स जोडले आहेत. कोणते आहेत हे फिचर्स पाहूयात..
सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्हीमध्ये काय आहे खास?
निओ क्यूएलईडी टीव्ही सीरिजमध्ये कंपनीने सॅमसंगचा नवा एनक्यू 8 एआय जेन 3 प्रोसेसर दिला आहे. यात वापरण्यात आलेला एनपीयू मागील व्हर्जनपेक्षा दुप्पट वेगवान आहे. सॅमसंगच्या 2024 सालच्या ओएलईडी टीव्हीमध्ये एस 95 डी प्रोसेसर आहे. हा टीव्ही 77 इंचापर्यंतच्या आकारात उपलब्ध असेल, जो आधीच्या व्हर्जनपेक्षा 20 टक्के चमकदार असेल. हा टेलिव्हिजन स्क्रीन 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. यात ओएलईडी डिस्प्ले मिळेल, जो ग्लेअर फ्री टेक्नॉलॉजीसह येईल. याशिवाय सॅमसंगने एस 90 डी आणि एस 85 डी 42 इंच ते 83 इंच अशा वेगवेगळ्या आकारात सादर केले आहेत.
एआय फिचर्स मजेशीर असतील
स्मार्ट टीव्ही एअर इन्फिनिटी डिझाइनसह येणार आहेत. त्यांची जाडी फक्त 12.9 मिमी असेल. या सीरिजमध्ये एआयशी संबंधित अनेक फीचर्स मिळणार आहेत, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव सुधारेल. हे टीव्ही 8K AI अपस्केलिंग प्रो फीचरसह येतील. याशिवाय AI मोशन एन्हान्सर प्रो आणि रिअल डेप्थ एन्हान्सर प्रो सारखे फीचर्स मिळणार आहेत. या डिव्हाइसमध्ये टायझेन ओएस 2024 मिळेल, जे सॅमसंग गेमिंग हब अॅक्सेसरीज, मोबाइल स्मार्ट कनेक्ट, मल्टी कंट्रोल, 360 ऑडिओ आणि इतर वैशिष्ट्यांसह येईल. यात ऑडिओ सबटायटल्स असतील, जे एआय वापरून तुम्हाला गोष्टी समजावून सांगतील.
सॅमसंगने या डिव्हाईससह आपला transparent डिस्प्ले लाँच केला आहे. दिसायला हा डिस्प्ले फक्त काचेचा मोठा तुकडा वाटतो. मात्र यात मायक्रो एलईडी चिप्सचा वापर करण्यात आला आहे. या पारदर्शक मायक्रो एलईडीमु Clear Image निर्माण होते. याशिवाय कंपनीने प्रीमिअर 8K प्रोजेक्टर लाँच केला आहे.
इतर महत्वाची बातमी-