एक्स्प्लोर

OnePlus 12 : खुशखबर! OnePlus 12 लवकरच होणार लाँच, लुक आणि फिचर्स आहेत दमदार

ONEPLUS 12 आता लवकरच लाँच होणार आहे. या आगामी फोनचा लुक आणि दमदार फिचर्स समोर आले आहेत.

OnePlus 12 First Look : OnePlus  ने यावर्षी भारतात बरेच फोन त्यांनी बाजारत आणले आहेत.  OnePlus V Fold आॅगस्टमध्ये बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ही कंपनी आपला पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. OnePlus 11 च्या मोठ्या यशानंतर कंपनी आता ग्राहकांकरता OnePlus 12 बाजारात आणणार आहे. ज्याचे फिचर्स आणि लुक दमदार असणार आहेत.

 हा स्मार्टफोन स्लिम आणि प्रीमियम डिझाइनसह येईल.  हा फोन सुरूवातीस काळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. या आगामी फोनच्या कॅमेऱ्यात अनेक चांगले फिचर्स पाहायला मिळणार आहेत. याच्या कॅमेरा  सेटअपची प्रेरणा नुकत्याच लाँच झालेल्या OPPO Reno 10 Pro+ वरून घेतली गेली आहे. या फोनच्या संपूर्ण लुक आणि फिचर्सबद्दलची पोस्ट Leakster OnLeaks ने त्यांच्या ट्विटरवर टाकली आहे. कसा असेल या आगामी फोनचा लुक, फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

OnePlus 12 कॅमेरा

 OnePlus 12  एक नवीन पेरिस्कोप कॅमेऱ्याची टेस्टिंग करत आहे. ज्याचा प्रोडक्ट कोड “SM8650” आहे. Oneplus 12 आणि Oneplus 12 Pro मॉडेल्सचा कॅमेरा जुन्या Oneplus 11 सीरीजपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स असेल तसेच चांगली झूम क्वॉलिटी मिळेल. भारतीय बाजारातील फ्लॅगशिप  OnePlus 11 5G फोन पाहता ह्यात 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा क्वॉडएचडी+ सुपर फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. तसेच 120 Hz रिफ्रेश रेटवर चालतो. सोबतच हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 + 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 32MP Sony IMX709 पोर्टरेट टेली लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंट पॅनलवर 16MP Sony IMX471 सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी ह्यात 100 Watt SuperVOOC (Voltage Open Loop Multi-step Constant-Current Charging) फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus 12 प्रोसेसर 

OnePlus 12 पावरफुल मोबाइल प्रोसेसरसह लाँच केला जाईल, हे सर्व टेकप्रेमींना माहीत असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाईल. 

OnePlus 12 किंमत

OnePlus 12 ची किंमत ही 50,000 रूपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर OnePlus 12 येत्या 12 डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल नंतर भारतात होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

Elon Musk : मस्क देणार ChatGPT ला टक्कर, xAI नवीन आर्टिफिशल इंटेलिजंस कंपनी लाँच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget