एक्स्प्लोर

Piponet Railway App: रेल्वेचे नवीन अॅप होणार लाँच; पाहा काय आहे खास

Piponet Railway App:  रेल्वेने करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन अॅप  लाँच करण्यात येणार आहे.

Piponet Railway App:   NuRe भारत नेटवर्क आणि रेलटेल (RailTel) हे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन अॅप  लाँच करणार आहेत. या अॅपचे नाव  PIPOnet असं आहे.  या मध्ये रेल्वे प्रवाशांना अनेक सेवा मिळणार आहेत. NuRe भारत नेटवर्क आणि RailTel यांच्याकडून PIPOnet हे नवीन रेल्वे अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग, मनोरंजन, कॅब बुकिंग आणि इतर काही सेवा मिळणार आहेत. या अॅपमध्ये काय खास आहे? हे जाणून घेऊयात...

अनेक सेवा या एकाच अॅपमध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत. याशिवाय या अॅपमध्ये प्रवाशांना ऑनलाइन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मुक्काम आरक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अॅपमध्ये जाहिराती  देखील असणार आहेत.  RailTel नं दिलेल्या माहिती नुसार, NuRe Bharat Network सोबत यासाठी भागीदारी करण्यात आली आहे. कंपनीने पुढील 5 वर्षांत अॅपमधून 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.

PIPOnet  हे अॅप येत्या दोन आठवड्यांत अँड्रॉइड प्ले स्टोअरवरुन (Android Play Store) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल, असं म्हटलं जात आहे. आयओएस वापरकर्त्यांसाठी हे अॅप  उपलब्ध असेल की नाही?  याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

PIPOnet या एकाच रेल्वे अॅपमध्ये तुम्हाला इतर अनेक अॅप्सच्या सुविधा मिळतील. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांना वेगवेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.

PIPOnet  या अॅपमधून कोणतीही सेवा मोफत दिली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला या अॅपमधून ऑनलाइन ट्रेन तिकिटा बुक केले तर त्याचे पैसे  द्यावे लागतील. तसेच, जर तुम्हाला या अॅपमधील इतर कोणत्याही सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

नुरे भारत नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅक्स कृष्णा यांनी यांनी एका निवेदनात म्हटले की, ''Nure Bharat Network हे स्पष्ट करू इच्छिते की, Netflix, Ola, Uber आणि इतर कोणत्याही कंपनीची नावे जी PIPOnet या अॅपसोबत जोडले गेलेले नाही. मनोरंजन, प्रवास आणि इतर सुविधांचा परिचय देण्यासाठी केवळ उदाहरणाचा एक भाग म्हणून या अॅपचा उल्लेख करण्यात आला होता. आम्ही अद्याप कोणत्याही अन्य कंपनीसोबत याबाबत चर्चा केलेली नाही.''  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Vande Bharat: आता मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड; महाराष्ट्राला मिळणार चौथी 'वंदे भारत' ट्रेन

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget