एक्स्प्लोर

Motorola razr 50 : मोटोरोलाचा razr 50 फोल्डेबर स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Motorola razr 50 : या डिव्हाइसला 4,00,000 फोल्ड्सची मान्यता प्राप्त आहे आणि याला IPX8 अंडरवॉटर प्रोटेक्शन आहे

मुंबई : मोबाईल तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनमध्ये अग्रगण्य असलेल्या मोटोरोला कंपनीने razr फ्रन्चायझीमधील razr 50 हा फोन अत्यंत प्रतीक्षित फोन सादर करत आज पुन्हा एकदा फोल्डेबल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणली आहे. razr फ्रँचायझीमधील या नव्या स्मार्टफोनमधून मोटोरोला कंपनीची स्मार्टफोन तंत्रज्ञानात कायम प्रगती करत राहण्याची बांधिलकी अधोरेखित होते. या फोनमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठा 3.6 इंचांचा एक्स्टर्नल डिस्प्ले आहे आणि गुगल Gemini चा थेट ऍक्सेस मिळतो. Moto AI समर्थित 50MP च्या OIS आणि इन्स्टंट ऑल-पिक्सेल फोकस असलेल्या अत्याधुनिक कॅमेरा सिस्टीम असलेला razr 50 आधुनिक तंत्रज्ञानासह फेस्टिव्ह सिझनमध्ये मर्यादित कालावधीसाठी फक्त रु.49,999* या किमतीत उपलब्ध आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये खरेदी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

razr 50 या आपल्या पूर्वसूरीप्रमाणेच मोटोरोला razr 50मध्ये फोल्डेबल तंत्रज्ञान नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. या फोनमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बाह्य डिस्प्ले आहे. 3.6" pOLED मोठा बाह्य डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टसने संरक्षित आहे. 90Hzचा डायनॅमिक रिफ्रेश रेट आणि 1700 निट्सच्या पीक ब्राइटनेस असलेल्या या डिस्प्लेमुळे जबरदस्त दृश्य अनुभव मिळतो. या फोनमध्ये 1056 x 1066 पिक्सेलचे हाय-रेझोल्यूशन आहे. त्यामुळे 10-बिट डेप्थ, 100% DCI-P3 कव्हरेज आणि SGS आय प्रोटेक्शनसह स्पष्टता आणि व्हायब्रंट रंगसंगती प्राप्त होते. डिस्प्लेला HDR10 प्रमाणपत्र प्राप्त असल्याने रंगांची अचूकता आणि ब्राइटनेस वाढतो. त्यामुळे विविध प्रकारे वापर करण्यासाठी हा एक उत्तम फोन आहे. याचा आकार मागील जनरेशनपेक्षा 2.4 पट मोठा युझर्सना वापरकर्त्यांना अधिक समृद्ध अनुभव मिळतो. त्यांना आता फोन न उघडता अॅप्समध्ये सहजपणे नेव्हिगेट करणे, मेसेजेसला उत्तर देणे, गुगल मॅप्स किंवा गेम्स वापरणे शक्य होते. Always-On Display (AOD)मुळे वैयक्तिकरणासाठी कस्टमायझेबल थीम्स आणि स्लीप डिस्प्लेसारखा अतिरिक्त डिस्प्ले उपलब्ध होतो. razr 50 मध्ये व्हॉल्यूम कीजने झूम करणे, पॉवर की लाँग प्रेस करून गुगल Gemini चा क्विक ॲक्सेस, आणि सुरळीत नॅव्हिगेशनसाठी 'सी ऑल पॅनल्स' ओव्हरव्ह्यू स्क्रीनसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

razr 50 मध्ये वापरकर्ते एक्स्टर्नल डिस्प्लेवरून गुगलचे Gemini अॅप थेट वापरू शकतात. Gemini हा एक वैयक्तिक AI असिस्टंट आहे. हा असिस्टंट क्रिएटिव्हिटी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी सविस्तर सूचना हव्या असतील, सहलीची योजना आखण्यासाठी मदत हवी असो किंवा ईमेल व धन्यवाद देण्यासाठीचा मजकूर लिहायचा असेल, Gemini नेहमीच तुमच्या मदतीसाठी सज्ज असेल. या व्यतिरिक्त, तो दैनंदिन कामांसंदर्भात विविध कल्पनांवर विचारविनिमय करण्यासाठीही तो मदत करतो आणि गुगल मॅप्स, यूट्यूब, फ्लाइट्स, जीमेल, आणि ड्राइव्हसारख्या गुगलच्या सेवा सहजपणे उपलब्ध करून देतो. नेहमी उपलब्ध असलेला Gemini तुम्हाला हवी असलेली मदत करण्यास कायम सज्ज असतो.

नव्या razr डिव्हाइसवर एक्स्टर्नल डिस्प्लेचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी, मोटोरोलाने गुगल फोटोजचा ॲक्सेस दिला आहे. यामुळे वापरकर्त्यांना आपले फोन न उघडता स्थानिक किंवा क्लाऊडमध्ये संग्रहित असलेले फोटो किंवा व्हिडिओ पाहणे, डिलीट करणे, फेव्हरेट करणे किंवा शेअर करणे सोपे झाले आहे. या सुविधामुळे मेमरी पटकन ॲक्सेस करता येते आणि फोटो लवकर शोधणे सोपे होते. जेव्हा हे फोटो एडिट करायची वेळ येते, तेव्हा युझर razr ओपन करून गुगल फोटोजमधील नवीन AI-समर्थित एडिटिंगची साधने वापरू शकतात. यात AI मॅजिक एडिटर, AI मॅजिक इरेझर, AI फोटो एनब्लर आणि अशी अनेक साधने समाविष्ट आहेत. याशिवाय, Photomoji सारख्या साधनांचा वापर करून आपले आवडते फोटो पर्सनलाइझ्ड इमोजीमध्ये व स्टिकर्समध्ये रूपांतरित करून संदेश आकर्षक करता येतात. AI मॅजिक कंपोजने युझर्स एक्सायटेड, चिल, फॉर्मल आणि शॉर्टसारख्या विविध शैलींमध्ये टेक्स्टिंगसाठी सुचवलेले प्रतिसाद मिळतात. त्यामुळे या संदेशांना एक प्रकारचे कल्पक रूप प्राप्त होते.

मोटोरोला razr 50 मध्ये क्रिएटिव्हिटी, कॅप्चरिंग आणि दैनंदिन सहाय्यता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या अॅडव्हान्स्ड Moto AI क्षमता आहेत. Moto AIमधील AI मॅजिक कॅनव्हास सारख्या वैशिष्ट्यांमुळे तुमच्या कल्पना वास्तवात येऊ शकतात. याचा वापर करून तुम्ही टेक्स्ट प्रॉम्प्ट्स देऊन सुंदर प्रतिमा तयार करू शकता. तसेच AI जनरेटिव्ह थीमिंगमुळे तुमच्या फोनचा वॉलपेपर तुमच्या स्टाईलशी सुसंगत करू शकता. महत्त्वाचे क्षण टिपून ठेवण्यासाठी, AI फोटो एन्हान्समेंट इंजिन डायनॅमिक रेंज आणि तपशील सूक्ष्मपणे फाइन-ट्यून करून उच्च गुणवत्तेचे प्रतिमा सुनिश्चित करते, अगदी कमी प्रकाशातही हे साध्य करता येते. AI ॲडॅप्टिव्ह स्टॅबिलायझेशन आणि इंटेलिजंट ऑटो फोकस ट्रॅकिंगमुळे तुमचे व्हिडिओ आणि फोटो स्थिर आणि फोकस्ड राहतात. स्मार्ट कलर सेगमेंटेशनमुळे फोटो अधिक चांगला होता. आकाश, त्वचा, गवत यासारखरे घटक वैयक्तिकरीत्या ट्यून करून रंग अजून खुलून येतात. या व्यतिरिक्त तुम्हाला दैनंदिन कामांमध्ये मदत करण्यासाठी Moto AI मध्ये Adobe Doc Scan सारखी वैशिष्ट्ये आहेत. यांचा वापर करून कागदपत्रे स्कॅन व शेअर करणे सोपे होते, RAM Boost 3.0मुळे परफॉरमन्स उत्तम होतो, बॅटरी ऑप्टिमायझेशन होते आणि तुमची संवेदनशील माहिती आपोआप धुसर करून तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी स्क्रीनशॉट वुइथ ऑटो ब्लर सुविधा उपलब्ध आहे.

मोटो AIचे पाठबळ लाभलेल्या मोटोरोला razr 50मधील अतुलनीय कॅमेरा सिस्टीममुळे प्रत्येक क्षण अत्यंत स्पष्ट आणि अचूकतेने टिपला जातो. 50MPचा हाय रेझोल्युशन कॅमेऱ्यामुळे कमी प्रकाशातही उत्तम फोटो येतात. प्रकाश कसाही असो, इन्स्टंट ऑल-पिक्सेल फोकसचा वापर करून 32x अधिक फोकसिंग पिक्सेलने जलद, अधिक अचूक परफॉरमन्सह फोटो काढता येऊ शकतात. कॅमेऱ्यातील क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानामुळे कमी प्रकाशातील फोटोही चांगले येतात. 12.6MPचे फोटो अधिक उजळ व कमी नॉइससह मिळतात तर ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनमुळे (OIS) थरथर होत नाही आणि स्फिटकासारखे स्पष्ट फोटो येतात. एक्स्टर्नल डिस्प्लेवरील सेकंडरी कॅमेरा हा 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा असून त्यात मायक्रो व्हिजन सेन्सरही आहे. 120º अल्ट्रा वाइड अँगल लेन्समुळे त्यात प्रत्येक तपशील डिपला जातो. स्टँडर्ड लेन्सच्या तुलनेने चौपट दृश्य या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सामावते आणि मायक्रो व्हिजनमुळे स्टँडर्ड लेन्सच्या तुलनेने युझर त्यांच्या सब्जेक्टच्या चौपट जवळ जातात आणि अगदी सूक्ष्म बारकावेही टिपले जातात. सेल्फीसाठी 32MPचा कॅमेरा उत्तम दर्जाच्या इमेजेस आणि व्हिडिओ कॉल करता येतात. यासाठी razr युझर्स फ्लेक्स व्ह्यू वापरू शकतात, जेणेकरून हँड्स-फ्री व व्हिडिओ कॉल्ससाठी त्यांना सुयोग्य अँगल मिळू शकेल. गुगल फोटोज AIने तुमचे फोटो अधिक चांगले करता येऊ शकतात. तुम्ही मॅजिक इरेझरने अनावश्यक भाग काढू शकता, फोटो अनब्लरचा वापर करून धुसर इमेजेसमध्ये सुधारणा करता येऊ शकते आणि मॅजिक एडिटरच्या जनरेटिव्ह AIने तुमचे शॉट्स परिवर्तीत करू शकता.
मोटोरोला razr 50 हा टिकाऊ आणि स्टाइल लक्षात घेऊन डिझान करण्यात आला आहे. हा फोन अभिजात प्रीमिअम वेगन लेदर फिनिशमध्ये आणि पॅन्टोन-क्युरेटेड रंगांमध्ये उपलब्ध आहे. या डिव्हाइसची नावीन्यपूर्ण गॅपलेस आणि उत्तम प्रकारे घडवलेली कडा डिझाईन धुळीपासून अधिक संरक्षण देते आणि आलिशान अनुभव प्रदान करते. नव्याने डिझाइन केलेल्या बिजागरीमुळे (हिंज) एका हाताने फ्लिक ओपन करणे किंवा स्नॅप शट करणे सोपे जाते. हे डिझाइन घडविताना कमी करण्यात आलेल्या स्प्रिंग टेन्शनमुळे हे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे मुख्य डिस्प्लेवर किमान सुरकुती पडावी यासाठी फ्लोटिंग हिंज प्लेट त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. बिजागरी व स्क्रीनची काटेकोर स्ट्रेस टेस्ट करण्यात आली आहे आणि razr 50 तब्बल 4,00,000** फोल्ड्साठी प्रमाणित असल्याची खात्री करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, हे डिव्हाइस IPX8 रेटिंग असलेले अंडरवॉटर संरक्षण देते. त्यामुळे हा फोन 1.5 मीटर पाण्याखाली 30 मिनिटांपर्यंत टिकून राहू शकतो, तर एक्स्टर्नल डिस्प्लेला कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टसने संरक्षित करण्यात आले आहे.

मोटोरोला razr 50 ओपन केल्यावर मोटो razrचा 6.9 इंचांचा pOLED डिस्प्ले दिसतो. या डिस्प्लेमुळे अखंडित व इमर्सिव्ह दृश्यानुभव प्राप्त होतो. स्मूथ स्क्रोलिंगसाटी या डिस्प्लेमध्ये 120Hzचा रिफ्रेश रेट आहे, व्हायब्रंट व्हिज्युअल्ससाठी 3000 निट्सचा कमाल ब्राइटनेस आहे आणि समृद्ध, जिवंत रंगांसाठी 120% इतकी  DCI-P3 कलर ॲक्युरसी आहे. HDR10+ सपोर्टमुळे युझर्स डीप ब्लॅक, उत्तम हायलाइट्स आणि सिनेमॅटिक कलर स्प्रेक्ट्रमचा आनंद घेऊ शकतात. मोठ्या फोल्ड रेडिअसमुळे सुरकुत्यारहीत डिझाइन शक्य झाले आहे. परिणामी, स्मूथ, अखंडित टचस्क्रीन अनुभवता येते. razr 50मध्ये डॉल्बी ॲटमॉस स्टिरिओ स्पीकर्स असून त्यात स्पॅटिअल ऑडिओसुद्धा आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या एकूण अनुभवात वृद्धी होते. मोटोरोला razr 50 कोआला ग्रे, बीच सँड किंवा स्प्रिट्झ ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध असून अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभिजात डिझाइन याची सांगड घातली गेल्याने तो टिकाऊ आणि तितकाच स्टायलिश झाला आहे.
मोटोरोला razr 50चा प्रभावी डिस्प्ले, पॉवरफुल कॅमेरा आणि इतर अत्याधुनिक वैशिष्ट्यांना मीडियाटेक डायमेन्सिटी 7300X प्रोसेसरची शक्ती लाभली आहे. त्यामुळे हा ॲडव्हान्स्ड प्रोसेसर असलेला हा भारतातील पहिला फ्लिप फोन आहे. यात अत्यंत कार्यक्षम असा 4nm प्लॅटफॉर्म असून युझर सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसह काम व खेळांचा वेग वाढवू शकतात. त्यामुळे बॅटरीसुद्धा जास्त काळ टिकते. इंटिग्रेटेड मीडियाटेक APU 655 मुळे AIची क्षमता अजून वाढते. त्यामुळे सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये अखंडित अनुभव मिळतो. 8जीबी LPDDR4X रॅम आणि 256जीबी UFS 202 स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये युझर्स स्मूथ मल्टिटास्किंग करू शकतात व त्यांच्या आवडत्या कंटेन्टसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.

या लाँचबद्दल मोटोरोला इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. एम. नरसिंहन म्हणाले, "फ्लिप फोन तंत्रज्ञानाचे प्रणेते म्हणून, आम्ही razr 50 लाँच करून या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा एक नवा मापदंड स्थापित केला आहे. हे इनोव्हेटिव्ह आणि बुद्धिमान डिव्हाइस डिझाइन, AI तंत्रज्ञान, आणि युझरला मिळणारा अनुभव अधिक चांगला करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. आम्हाला विश्वास आहे की razr 50 मुळे फोल्डेबल स्मार्टफोन अधिक लोकांपर्यंत पोहोचतीलच, त्याचप्रमाणे razr 50 अल्ट्राप्रमाणाचे या फोनकडून आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक सुविधा त्यांना मिळतील."

अँड्रॉइड 14च्या Hello UI सह त्यांना ही सिस्टीम सहज वापरता येते, पर्सनलाइझ करता येते आणि सुरक्षित अनुभव मिळतो. ते सहजपणे फॉन्ट्स, रंग, आणि आयकॉन निवडून आपले डिव्हाइस कस्टमाइज करू शकतात, तसेच ट्विस्ट आणि टॅप सारख्या नैसर्गिक हालचालींनी विविध फीचर्स नियंत्रित करू शकतात किंवा त्यांची आवडती अॅप्स लाँच करू शकतात. पालक स्क्रीन टाइमवर मर्यादा सेट करू शकतात आणि अॅप्सचा ॲक्सेस नियंत्रित करू शकतात, त्यामुळे त्यांची मुले सुरक्षित आणि त्यांच्यासाठी सुनिश्चित असलेल्या ठिकाणी शिकू व खेळू शकतात. Hello UI मध्ये Moto Gestures, Moto Secure with Thinkshield, Family Spaces, आणि Moto Unplugged यांसारखी फीचर्स समाविष्ट आहेत. स्मार्ट कनेक्ट फीचर वेगवेगळ्या डिव्हाइसना जोडते. या फीचरमुळे फोन, टॅबलेट आणि पीसीवर कामांचे संक्रमण म्हणजे ट्रान्झिशन सुलभपणे होते. परिणामी, एकसंध आणि कार्यक्षम डिजिटल जीवनासाठी हे एक महत्त्वाचे साधन ठरते. स्मार्ट कनेक्टमध्ये वापरकर्त्यांना स्वाइप टू शेअर, क्रॉस डिव्हाइस कंट्रोल, कंन्टेक्स्ट अवेअर फोन, युनिव्हर्सल क्लिपबोर्ड, शेअर हब, ॲप स्ट्रीम आणि इतर अनेक कार्यक्षमतेचा लाभ मिळतो. प्रत्येकाची आपली अनोखी वैशिष्ट्ये आहेत, जी सुलभ एकत्रीकरण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

बॅटरी परफॉरमन्सबद्दल सांगायचे झाले तर मोटोरोला razr 50 हा दिवस-रात्र सुरू राहण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4200mAhची बॅटरी आहे. सिंगल चार्जमध्ये ती दिवसभर पुरते. 30Wच्या TurboPowerTM चार्जिंगने, काही मिनिटांतच दिवसभर फोन सुरू राहण्याइतकी बॅटरी चार्ज होते. या डिव्हाइसमध्ये 15W वायरलेस चार्जिंगचीही सुविधा आहे आणि रिव्हर्स चार्जिंगसह तुम्ही इतर डिव्हाइसेससोबतही सहजपणे पॉवर शेअर करू शकता. या व्यतिरिक्त, फोन तुम्हाला वेगवान 5जी अनुभव देतो, एकूण 16 5जी बँड्सना आणि WiFi 7 ला हा फोन सपोर्ट करतो. यात सिमकार्ड स्लॉट आहे आणि अतिरिक्त सुविधेसाठी eSIMसुद्धा देण्यात आले आहे.

याशिवाय, मोटोरोला razr 50 मध्ये डॉल्बी अॅटमॉस®सह स्टिरिओ स्पीकर्स आहेत, जे 20% जास्त आवाज आणि 25% अधिक बेसचा ध्वनी अनुभव देतात. वापरकर्त्यांच्या आवडत्या गाण्यांमध्ये डॉल्बी अॅटमॉस®मुळे संगीताचे अधिक बारकावे अनुभवता येतात आणि ते कलाकारांच्या अधिक जवळ जाऊ शकतात. शिवाय, डॉल्बी अॅटमॉस®मध्ये Spatial Audio आहे, ज्यामुळे आवाज एक आभासी जागेत त्यांच्या सभोवताली फिरतो. आवाज वाढवल्यावर तो फाटणार नाही याची स्मार्ट पॉवर अॅम्प्लिफायर याची खात्री करतो, आणि स्पीकर्स एकत्र काम करत असल्यामुळे स्क्रीनवरील दृश्यातील प्रसंगांनुसार आवाज एका स्पीकरमधून दुसऱ्यात प्रवास करतो. याशिवाय, मोटोरोला razr 50 मध्ये 3 OS अपडेट्स आणि 4 वर्षांच्या सिक्युरिटी पॅचेसची खात्री आहे, ज्यामध्ये मोटो प्रीमियम केअरचे फायदे मिळतात.

उपलब्धता :

मोटोरोला razr 50 amazon.in, motorola.in आणि रिलायन्स डिजिटलसह प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये प्रीमियम व्हेगन लेदर फिनिश आणि 3 आकर्षक पॅन्टोन क्युरेटेड रंगांमध्ये—कोआला ग्रे, बीच सॅंड आणि स्प्रिट्झ ऑरेंज उपलब्ध असेल.

किंमत :

लाँच किंमत: रु. 64,999 
खास मर्यादित कालावधीसाठी रु.5,000ची फेस्टिव्ह डिस्काउंट ऑफर (ऑफर मर्यादित कालावधीसाठी)
खास मर्यादित कालावधीसाठी रु.10,000ची फेस्टिव्ह बँक ऑफर (ऑफर मर्यादित कालावधीसाठी)
निव्वळ किंमत,
motorola razr 50: रु. 64,999 रु. 49,999*

कन्झ्युमर ऑफर

1. रु.5,000 चा मर्यादित कालावधीसाठी फेस्टिव्ह डिस्काउंट
2. आघाडीच्या बँकांकडून रु.10,000चा इन्स्टंट बँक डिस्काउंट
3. या व्यतिरिक्त आघाडीच्या बँकांकडून दरमहा रु.2778 पासून सुरू होणारी 18 महिन्यांपर्यंतची नो कॉस्ट ईएमआय ऑफर
4. 3 महिन्यांचे गुगल Gemini ॲडव्हान्स्ड सबस्क्रिप्शन आणि 2टीबीची क्लाउड स्टोरेज स्पेस
या प्रॉडक्टबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी :
ॲमेझॉन : - https://www.amazon.in/b?node=100578573031 
मोटोरोला इंडिया - https://www.motorola.in/smartphones-motorola-razr-50/p 

मोटोरोलाने लाँच केला razr 50 : भारताच्या फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात क्रांती, 3.6” मोठा एक्स्टर्नल डिस्प्ले, गुगल Gemini AI, नव्याने डिझाइन केलेली टीअरड्रॉप हिंज आणि 50MP OIS कॅमेरा – विशेष फेस्टिव्ह किंमत फक्त रु.49,999*! प्रीबुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू

मोटोरोला razr 50 मध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठा 3.6"आकाराचा एक्स्टर्नल डिस्प्ले आहे. या फोनमध्ये गुगलचे Gemini AI तंत्रज्ञान आणि 90 Hz चा फास्ट रिफ्रेश रेट आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक चांगला आणि सुलभ वापराचा अनुभव मिळतो. शिवाय, कॉर्निंग® गोरिला® ग्लास विक्टसने एक्स्टर्नल डिस्प्लेचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे टिकाऊपणाची खात्री मिळते.

OIS असलेल्या 50MP कॅमेऱ्याने कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढता येतात. फोटो स्पष्ट येण्यासाठी यात इन्स्टंट ऑल-पिक्सेल फोकस वापरण्यात आला आहे. क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानामुळे उजळ, नॉइस-फ्री 12.6MP फोटो येतात. razr 50 मध्ये 13MP अल्ट्रावाइड + मायक्रो लेन्स आहे, ज्यात PDAF आणि 120° FOV आहे.

मोटोरोला razr 50 मध्ये मोटो AI आहे. त्यामुळे पर्सनलाइझ्ड अनुभव आणि कार्यक्षम मल्टिटास्किंग साध्य होऊन युझर इंटरॅक्शन अधिक चांगले होते. या फोनमध्ये कंटेन्ट तयार करण्यासाठी मल्टिपल फ्लेक्स व्ह्यू अँगल आणि न्यू कॅमकॉर व डेस्क मोडही आहेत.

डिझाइनचा विचार करता मोटोरोला razr 50 मध्ये पॅन्टोनने सुनिश्चित केलेल्या रंग आणि वेगन लेदर फिनिश मिळते. त्याचप्रमाणे सुधारित डस्ट प्रोटेक्शनसाठी फटरहीत कॉम्पॅक्ट डिझाइन आहे आणि विनासुरकुती 6.9 LTPO pOLED डिस्प्लेसाठी मोठी फोल्ड रेडिअस या फोनमध्ये आहे.

मोटोरोला razr 50 हा पहिला असा फ्लिप फोन आहे, ज्यात 8जीबी + 256जीबी बिल्ट-इन स्टोरेजसह मीडियाटेक डायमेन्सिटी 7300X प्रोसेसर आहे.

मोटोरोला razr 50 हा फोन 20 सप्टेंबरपासूनच्या सणासुदीच्या काळात सेलमध्ये उपलब्ध होणार असून त्याची किंमत रु.49,999* (उत्सवानिमित्त रु.5,000चा फ्लॅट डिस्काउंट आणि रु.10,000चा इन्स्टिंट बँक डिस्काउंट समाविष्ट) इतकी असणार आहे. या फोन ॲमेझॉन, मोटोरोला.इन, रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि भारतातील प्रमुख आउटलेट्समध्ये उपलब्ध होईल.

ग्राहक 10 सप्टेंबर 2024 पासून ॲमेझॉन तसेच रिटेल स्टोअर्समध्ये मोटोरोला razr 50 ॲमेझॉन तसेच रिटेल स्टोअर्समध्ये प्री-बुकसुद्धा करू शकतात.

ग्राहक आघाडीच्या बँकांचा नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय वापरून दरमहा फक्त 2,778 रुपये देऊन razr 50 घेऊ शकतात. ग्राहक रिलायन्स जिओमधील रु.15,000/- इतक्या मूल्याचा लाभ घेऊ शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Raj Thackeray and Nitesh Rane: राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Raj Thackeray and Nitesh Rane: राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
Embed widget