Mobile Tips : मोबाईलच्या बॅटरीसाठी 'हे' फीचर सर्वात घातक; फोन फक्त चार्जिंगवरच राहील
Mobile Tips : रिफ्रेश रेटचा स्क्रीन आणि बॅटरीशी थेट संबंध आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, मोबाईलची स्क्रीन एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश होते, त्याला रिफ्रेश रेट म्हणतात.
Mobile Tips : तुमच्या मोबाईलची (Mobile) बॅटरी झपाट्याने संपतेय त्यामुळे तुम्ही सतत चिंतेत आहात का? यामुळे तुम्हाला मोबाईल सतत चार्जिंगवर लावावा लागतो. तसेच, तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रिफ्रेश रेट (Refresh Rate) फीचरबद्दल तुम्ही ऐकले असेल. पण, तुम्हाला माहित आहे का हे फीचर तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफसुद्धा कमी करते. नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
असे बरेच लोक आहेत ज्यांना मोबाईलवर रिफ्रेश रेट किती सेट करावा हे माहित नसतं. रिफ्रेश रेट कमी किंवा जास्त असल्यास मोबाईलची बॅटरी कशी खराब होते ते जाणून घेऊयात. रिफ्रेश रेट मोबाईलच्या बॅटरी लाईफला कशा प्रकारे नुकसान पोहोचवते. हे जाणून घेण्यासाठी रिफ्रेश रेट म्हणजे काय ते समजून घेऊयात.
रीफ्रेश रेट म्हणजे काय?
रिफ्रेश रेटचा स्क्रीन आणि बॅटरीशी थेट संबंध आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, मोबाईलची स्क्रीन एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश होते, त्याला रिफ्रेश रेट म्हणतात. मोबाईल वापरत असताना मोबाईल नीट सुरु आहे याची खात्री करण्यात रिफ्रेश रेट महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, दुसरीकडे, रिफ्रेश रेट तुमच्या मोबाईलची बॅटरी वेगाने संपवतो.
रिफ्रेश रेट कसा बदलावा?
बहुतेक मोबाईलच्या मॉडेल्समध्ये, मोबाईल सेटिंग्जमधील डिस्प्ले ऑप्शनमध्ये तुम्हाला हे फिचर दिसेल. जर तुम्हाला डिस्प्ले ऑप्शनमध्ये हे फीचर दिसत नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये दिलेल्या सर्च फीचरच्या मदतीने हे फीचर शोधू शकता, प्रत्येक फोनचा UI (यूजर इंटरफेस) वेगळा असतो, त्यामुळे हे फीचर कुठेही असू शकते.
तुमचा फोन 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये 60 Hz, 90 Hz आणि 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट पर्याय मिळवू शकता. काही मॉडेल्समध्ये, कंपन्या फक्त 60 Hz आणि 120 Hz रिफ्रेश रेट पर्याय देतात.
फोनच्या सेटिंग्जवर जाऊन रिफ्रेश रेट बदलावा?
जर तुम्ही मोबाईलला कमी रिफ्रेश रेटवर सेट केले तर असे केल्याने फोनची बॅटरी लाईफ वाढू शकते. पण दुसरीकडे, जर तुम्ही मोबाईलला High Refresh Rate वर सेट केलं, तर तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफ झपाट्याने कमी होईल.
महत्त्वाच्या बातम्या :