Free AI Course: मायक्रोसॉफ्टकडून नव्या AI कोर्सेसची संधी, नवोदित तरुणांना करिअरसाठी ठरणार फायदेशीर
Free AI Course: AI ने यंदा टेक मार्केटमध्ये कमालीचे योगदान दिले आहे. त्यातच मायक्रोसॉफ्टकडून तरुणांसाठी मोफत AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.
Free AI Course: मायक्रोसॉफ्टकडून (Microsoft) नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. या कोर्सेसचा फायदा नवोदित तरुणांना होणार असल्याचं मायक्रोसॉफ्टडून सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरु केले आहेत. मायक्रोसॉफ्टने नव्या AI मशिन लर्निंग 12 आठवड्यांसाठी हे कोर्सेस सुरु केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यास मदत होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
हल्लीच्या आधुनिक जगात AI हे सर्वोत्तम संधी देणारं क्षेत्र म्हणून नावारुपाला येत आहे. या गोष्टीचाच विचार करुन मायक्रोसॉफ्टकडून या नव्या कोर्सेसची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थी तसेच नवोदित तरुण या सर्वांना या कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे. AI ने यंदा टेक मार्केटमध्ये कमालीचे योगदान दिले आहे. त्यातच मायक्रोसॉफ्टने आता हे नवे कार्सेस सुरु केल्याने टेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध असल्याचं आता म्हटलं जात आहे. त्यामुळे या कार्सेसचा फायदा तरुणांना कितपत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे हे कोर्से नेमके कोणते?
मायक्रोसॉफ्टने 12 आठवड्यांसाठी 24 विवध विषयांचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हे AI कोर्सेस तुम्ही मोफत शिकू शकणार आहात, कारण यासाठी मायक्रोसॉफ्टकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध AI संकल्पनांचा परिचय करून देण्यास मदत करणार आहे. AI आणि मशीन लर्निंगमधील फरक,त्यांचा चय यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश या कोर्सेसमध्ये करण्यात आला आहे.तसेच यामध्ये AI च्या क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जनरेटिव्ह AI समजून घेण्यासाठी आणि त्याचा वापर कसा केला जातो हे समजून घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून या कोर्सेसची सुरुवात करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट क्लाऊडवरुन तुम्ही या कोर्सेसविषयी अधिक माहिती मिळवू शकता.
सध्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय आणि अॅनालिटिक्स विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणते कोर्स योग्य आहेत यासाठी तुम्हालाच योग्य ते परिश्रम घ्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला AI विषयी नव्याने जाणून घ्यायचे असेल किंवा AI शिकून घेण्याची तुमची इच्छा असेल तर हे कोर्सेस तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकतील.
Microsoft has released a FREE AI course for beginners.
— AI World (@TheAIWorld_) June 8, 2023
It's a 12-week, 24-lesson course.https://t.co/HdyWDvCWaJ pic.twitter.com/Yam9LXmpzO