एक्स्प्लोर

AI vs Human : AI समाजाच्या उपयोगापेक्षा जास्त घातक ठरतंय का? टेक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

आर्टिफिशियल इंटिलिजेन्सचा धोका लक्षात घेऊन Center for AI Safety ने काही टेक लिडर्सचे स्टेटमेंट्स घेऊन हस्ताक्षर करून घेतले आहेत.

AI vs Human : साधारण गेल्या सात ते आठ महिन्यापासून आर्टिफिशियल इंटिलिजेन्सवर (AI) नवनवीन बातम्या समोर येत आहेत. एआयची ज्या कामासाठी निर्मिती झाली होती त्याउलट समस्या निर्माण होत आहेत. एआयमुळे मानवी जीवन सुखकर व्हावं आणि  त्याचा फायदा व्हावा, यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता एआयपासून निर्माण होणाऱ्या समस्या समोर येत आहेत. ओपन एआयच्या ChatGpt सारख्या टूलचा चुकीच्या कामासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकादायक परिणाम दिसून येत आहेत. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन जगभरातील प्रमुख टेक लिडर्सकडून आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे निर्माण होणाऱ्या भयंकर परिणामाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन मायक्रोसॉफ्ट सीटीओ केविन स्कॉट यांच्यासह इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी एआय बाबत सावध करताना सांगितले की, आर्टिफिशियल इंटिलिजेन्स समाजासाठी जितके धोकादायक ठरू शकते. हे मानवतेसाठीही तितकेच घातक ठरू शकते. 

एआयमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा कसं तोंड द्याल?  

Center for AI Safety या एजेन्सीने एक निवेदन जाहीर केले असून ज्यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी हस्ताक्षर केले आहेत. या निवेदनात आर्टिफिशियल इंटिलिजेन्सच्या नियमनसाठी प्राधान्यक्रम ठरवणे आणि मानवतेचा विचार करून त्याच्यातील संभाव्य धोके दूर करण्यावर भर दिला आहे. या निवेदनात एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. पुढे या निवेदना सांगण्यात आले की, आपली जागतिक प्राथमिकता संसर्गजन्य रोग आणि आण्विक युद्धासह इतर सामाजिक समस्या आणि एआयमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी असायला हवी.  

जेफ्री हिंटन यांनी गुगलची नोकरी का सोडली?

अलीकडेच टेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्व जेफ्री हिंटन यांनी एआयमुळे मानवतेसमोर मोठा धोका असल्याचं सांगत गुगलची नोकरी सोडली होती. अशातच आता टेक क्षेत्रातील इतर दिग्गज लोकांनीही एआयचा धोका ओळखून त्याच नियमन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत एआयवर काम करणाऱ्या लोकांत सामूहिक जाणीव निर्माण होत आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे.

इतर बातम्या वाचा :

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget