OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला, भारतात ChatGPT आणि AI साठी नव्या संधी उपलब्ध करण्यावर चर्चा
Sam Altman Meets PM Modi : ओपन एआय (Open AI) चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
![OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला, भारतात ChatGPT आणि AI साठी नव्या संधी उपलब्ध करण्यावर चर्चा openai ceo sam altman meets pm modi say he is very interested in ai OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला, भारतात ChatGPT आणि AI साठी नव्या संधी उपलब्ध करण्यावर चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/19e7cbdfdac1483a94b8ac4ee9f145591686279221348322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OpenAI ChatGPT : अलिकडे सर्वत्र आर्टिफिशन इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी (AI - Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा आहे. नुकतीच ओपन एआय (Open AI) या आर्टिफिशल इंटेलिजेंस टेक स्टार्टअप (Tech Start-Up) चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात OpenAI आणि ChatGPT ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सॅम अल्टमन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
सॅम अल्टमन पंतप्रधान मोदींच्या भेटीला
सॅम अल्टमन (Sam Altman) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. भेटीबाबत बोलताना अल्टमन यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आर्टिफिशल इंटेलिजेंन्स (AI) बाबत खूप उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आर्टिफिशल इंटेलिजेंन्ससाठीच्या संधी आणि नियम या विषयांवर चर्चा केल्याची माहिती सॅम अल्टमन यांनी दिली आहे. आयआयटी दिल्लीतील डिजिटल इंडिया कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे सांगितलं आहे.
काय आहे चॅट जीपीटी?
चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI - Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. या AI तंत्रज्ञानामुळे भविष्यात मानवाच्या नोकऱ्या जाणार अशी चर्चाही रंगली होती. सॅम अल्टमन यांनी भारत दौऱ्यादरम्यान यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
डिजिटल इंडिया चळवळीचं कौतुक
सॅम अल्टमन यांनी भारताच्या डिजिटल इंडिया चळवळीचंही कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, 'आज भारताने राष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाला ज्या प्रकारे पुढे नेले आहे ते प्रशंसनीय आहे. माझी अपेक्षा आहे की भारत सरकार अधिक सेवांमध्ये त्याचा समावेश करेल. चॅट जीपीटीला भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आम्ही लवकरच त्याचा प्रादेशिक भाषांसाठी वापर सुरु करण्याच्या तयारीत आहोत. सध्या Google 100 हून अधिक भारतीय भाषांना समर्थन देण्यावर ChatGPT काम करत आहे.
नीती आयोगाच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
सॅम अल्टमॅन गेल्या बुधवारीच अमिताभ कांत (Amitabh Kan) यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान अमिताभ कांत यांनी सॅम अल्टमॅन (Sam Altman) यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि त्याच्या क्षमता यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. अमिताभ कांत यांनी ट्विट करत माहिती दिली होती.
यासंबंधित इतर बातम्या :
Chat GPT is Paid : गुगलपेक्षा अचूक उत्तर देणाऱ्या ChatGPT साठी द्यावं लागणार शुल्क; नेमकं कसं काम करतं 'हे' सर्च इंजिन?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)