Metamate: Hi Metamate! झुकरबर्गच्या 'मेटा' कंपनीने लाँच केला AI चॅटबॉट
Metamate AI: मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीने आपला स्वत: चा AI चॅटबॉट विकसित केला आहे.
Metamate: AI चॅटबॉट स्पर्धेत उतरण्यासाठी मेटा कंपनीने कंबर कसली आहे. मेटा कंपनीने आपला AI (Artificial Intelligence) चॅटबॉट लाँच केला आहे. मेटामेट (MetaMate) असे या चॅटबॉटचे नाव आहे. AI मध्ये मोठं यश मिळालं असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी हे मेटामेट लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचा संकेत कंपनीने दिले आहेत. सध्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या लहान गटामध्ये ही मेटामेट AI चॅटबॉटचा वापर सुरू करण्यात आला आहे.
मेटाच्या मेटामेट एआय चॅटबॉटला कंपनीच्या अंतर्गत डेटावर प्रशिक्षित करण्यात आले आहे. मेटामेट हे चॅटबॉट केवळ कंपनीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. नवीन AI चॅटबॉट कंपनीच्या डेटाचा वापर कर्मचार्यांना मीटिंगचा सारांश देण्यासाठी, कोड लिहिण्यासाठी आणि डीबग वैशिष्ट्यांमध्ये मदत करण्यासाठी करत असल्याचे 'द व्हर्ज'च्या वृत्तात म्हटले आहे.
कंपनीचे कर्मचारी स्वतःचे प्रॉम्प्ट तयार करू शकतील आणि ते AI चॅटबॉटद्वारे सहकाऱ्यांसोबत शेअर करू शकणार आहेत.
चॅटबॉटला कसे सामर्थ्यवान बनवायचे याचा विचार करताना, मेटाने मायक्रोसॉफ्ट आणि व्हायरल चॅटबॉट चॅटजीपीटीचे मूळ ओपनएआय यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी स्वतंत्र, इन-हाऊस मॉडेल नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
या वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारी महिन्यात मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनी उच्च स्तरीय एक प्रोडक्ट तयार करत असून लवकरच कंपनीकडून एक creative आणि expressive टूल्स तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे म्हटले होते.
दीर्घ कालावधीसाठी, कंपनी " "AI personas" विकसित करेल जे युजर्सना विविध मार्गांनी मदत करणार आहे. मेटा-मालकीचे Instagram एका फीचरवर काम करत असून युजर्सना अॅपमध्ये AI सह चॅट करता येईल.
सॅम अल्टमन यांचं भारतीयांना आव्हान, म्हणतात...
दरम्यान, OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेक तज्ज्ञ, उद्योजकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भारतीयांना आव्हानदेखील दिलं.
भारतीयांनी ChatGPT ला प्रोत्साहन दाखवल्याबाबत कौतुकही केलं. पण या सोबतच त्यांनी भारतीयांना एक नवं आव्हान दिलं आहे. चॅटजीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी भारतीयांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे.
सॅम अल्टमन यांनी म्हटलं आहे की, भारतीय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) बाबतीत अमेरिकन कंपन्यांसोबत स्पर्धा करु शकत नाही. गुगल इंडिया आणि दक्षिण पूर्व आशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. गुगल इंडिया आणि दक्षिण पूर्व आशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजन आनंदन यांनी सॅम अल्टमन यांना विचारलं की, भारत ChatGPT सारखं AI टूल बनवू शकतो का? यावर अल्टमन यांनी म्हटलं की, AI ज्या पद्धतीने काम करते, त्यामध्ये तुम्ही आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. भारतीय ट्रेनिंग फाउंडेशन मॉडल्स देखील वापरून पाहू शकणार नाही आणि तरीही प्रयत्न करणं तुमचं काम आहे.