एक्स्प्लोर

Apple iPhone 15 : Apple 'हा' फोन कायमचा करणार बंद, iPhone 15 सीरीज आज लॉंच होणार, Apple इव्हेंट असेल अधिक खास!

Apple iPhone 15 : Apple चा हा इव्हेंट अधिक खास असणार आहे, कारण यावेळी Apple त्यांचा एक जुना iPhone कायमचा बंद करणार आहे, जाणून घ्या.

Apple iPhone 15 : Apple आज Apple iPhone 15 मालिका लॉंच करणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple कडून 4 नवीन iPhone लाँच करण्यात येतील, ज्यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असेल. यासोबतच ॲपलचा हा वार्षिक कार्यक्रम अधिक खास असणार आहे, कारण यावेळी अॅपल आपला एक जुना आयफोन कायमचा बंद करणार आहे. तुम्ही देखील ॲपलप्रेमी असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असले पाहिजे. Apple लॉन्च इव्हेंट आणि बंद झालेल्या iPhone बद्दल सविस्तर जाणून घ्या

Apple कंपनी 'हा' फोन कायमचा करणार बंद
ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी X प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करताना सांगितले की, iPhone 13 Mini चा स्टॉक कमी झाला आहे. तर अमेरिकेत आयफोन 13 मिनीच्या ऑनलाइन डिलिव्हरीसाठी 2 ते 3 आठवड्यांचा वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत Apple ने iPhone 13 Mini चे उत्पादन थांबवले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनी हा फोन बंद करण्याची तयारी करत आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या वर्षी iPhone 14 लाँच केल्यानंतर कंपनीने iPhone 11 आणि iPhone 12 Mini बंद केले होते.

iPhone 13 सीरीजबद्दल जाणून घ्या
आयफोन 13 लाइनअपमध्ये 4 फोन आहेत ज्यात iPhone 13, 13 मिनी, 13 प्रो आणि 13 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. हे फोन 2021 मध्ये लॉंच करण्यात आले होते. लॉंचच्या वेळी, iPhone 13 च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,900 रुपये होती. तर, iPhone 13 Pro व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये होती. iPhone 13 Pro Max ची किंमत 1,29,900 रुपये होती. iPhone 13 Mini ची किंमत 69,900 रुपये होती.

आयफोन 15 सह, हे गॅजेट्स लॉंच केले जाणार
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आयफोनशिवाय ॲपल या इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच सीरीज, एअरपॉड्स आणि नवीन OSची माहितीही देईल. कंपनी iOS 17, iPadOS 17 आणि watchOS 10 वर अपडेट देऊ शकते. Apple Watch Series 9 बद्दल सांगितले जात आहे की, यावेळी कंपनी अधिक चांगला हार्ट रेट सेंसर आणि U2 चिप देईल. ही मालिका 2 आकारात उपलब्ध असेल, त्यापैकी एक 41 मिमी आणि दुसरी 45 मिमी आहे. कंपनी 49 मिमीच्या आकारात अल्ट्रा 2 लाँच करू शकते. स्मार्टवॉचमध्‍ये अपडेट केलेली अल्ट्रा-वाइडबँड चिप "फाइंड माय" सपोर्ट वाढवेल आणि तुम्‍ही तुमचे Apple डिव्‍हाइसेस सहजपणे शोधण्‍यात सक्षम असाल.

Apple चा हा इव्हेंट अधिक खास
दरम्यान, Apple इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ऍपल पार्क येथे आयोजित कार्यक्रमाला तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसाल, तर तुम्ही ते घरी थेट पाहू शकता. कंपनी ॲपल इव्हेंट पेजवर ऑनलाइन स्ट्रीम करेल. यासोबतच तुम्ही हा कार्यक्रम Apple TV ॲपवरही पाहू शकता. कंपनी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम देखील करेल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल.

संबंधित बातम्या

Apple Event 2023: iPhone 15 सीरीज आज लाँच होणार, Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल? 'हे' गॅजेट्सही लाँच होणार, जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget