Apple Event 2023: iPhone 15 सीरीज आज लाँच होणार, Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल? 'हे' गॅजेट्सही लाँच होणार, जाणून घ्या
Apple Event 2023 : Apple आज Wanderlust इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Apple iPhone 15 सीरीजचे चार फोन लॉंच करणार आहे.
Apple Event 2023 : Apple आज Wanderlust इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Apple iPhone 15 सीरीजचे चार फोन लॉन्च करणार आहे. यासोबतच या इव्हेंटमध्ये आणखी काही गॅजेट्स लॉंच केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल? Apple Wanderlust इव्हेंटबद्दल जाणून घेऊया.
iPhone 15 सीरीजचे चार व्हेरिएंट लॉंच होणार
Apple कंपनी आज आपला Wanderlust कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात कंपनी iPhone 15 सीरीजचे चार व्हेरिएंट लॉंच होणार आहे. आयफोन 15 च्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड पिल-शेप असलेला कटआउट दिसेल. iPhone 15 चे सर्व मॉडेल्स USB-C पोर्टसह येतील. यासह, प्राईमरी कॅमेरा 48MP पर्यंत अपग्रेड केला जाऊ शकतो. iPhone 15 सीरीजमध्ये ॲक्शन बटण देखील दिसेल. या Apple इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीजसोबत इतर आणखी कोणते गॅजेट्स लॉन्च केले जातील? जाणून घ्या.
Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल?
दरम्यान, Apple इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील ऍपल पार्क येथे आयोजित कार्यक्रमाला तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसाल, तर तुम्ही ते घरी थेट पाहू शकता. कंपनी ॲपल इव्हेंट पेजवर ऑनलाइन स्ट्रीम करेल. यासोबतच तुम्ही हा कार्यक्रम Apple TV ॲपवरही पाहू शकता. कंपनी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम देखील करणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल.
Apple Watch Series 9
कंपनी या इव्हेंटमध्ये वॉच सीरीज 9 जगासमोर सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, वॉच सीरीज 9 चे डिझाईन वॉच सीरीज 8 सारखे असणार आहे. तर, सीरीज 9 नवीन चिपसह येऊ शकते. त्यामुळे Apple कंपनीचा परफॉर्मन्स आणखी चांगली होईल. हे वॉच नवीन रंग पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकतात. यामध्ये एक नवीन सेन्सर दिसेल, जो अधिक अचूक आणि विश्वासार्ह असेल. यात अल्ट्रा-वाइड बँड चिप देखील दिसेल. अल्ट्रा-वाइडबँड तंत्रज्ञानामुळे, ते जवळपासची इतर ऍपल डिव्हाईस शोधण्यात सक्षम असतील.
Airpods Pro
कंपनी या इव्हेंटमध्ये नवीन एअरपॉड्स लॉन्च करू शकते. त्यात चार्जिंगसाठी USB-C चार्जिंग केस मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या डिझाइनमध्ये कोणतेही नवीन बदल होणार नाहीत, परंतु ते सॉफ्टवेअर अपडेटसह येऊ शकते. जे एअरपॉड्सवरून ऑटोमॅटिक डिव्हाईस स्विचिंग, सेल्फ-म्यूट आणि अनम्यूट करण्याची सुविधा देईल. यामध्ये एक नवीन फीचर पाहता येईल, जेव्हा लोक या एअरपॉड्स द्वारे बोलू लागतील, तेव्हा त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ आपोआप थांबेल.
संबंधित बातम्या