Iphone 15 Heat Issue : पैसे जमवून iPhone घेतला पण चार्ज करताना हातच भाजला, नेमकं काय घडलं?
सध्या अनेकांनी महागडा असलेला Apple iPhone 15 Pro Max (iPhone 15) फोन खरेदी केला आहे. आयफोन 15 प्रो मॅक्स चार्ज करताना एका युजरचा हात भाजला आहे आणि फोनदेखली खराब झाला आहे. हे नेमकं कशामुळे घडलं? पाहुयात...
Iphone 15 Heat Issue : सध्या अनेकांनी महागडा असलेला Apple iPhone 15 Pro Max (iPhone 15) फोन खरेदी केला आहे. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिलं असल्याने अनेकांनी या फोनला पसंती दर्शवली. मात्र चार्जर विकत न घेता आपल्या जुन्या फोननेच अनेक लोक आयफोन 15 चार्ज करताना दिसत आहे. मात्र हे करणं धोकादायक ठरत असल्याचं आता समोर आलं आहे. आयफोन 15 चार्ज करताना एका युजरचा हात भाजला आहे आणि फोनदेखली खराब झाला आहे. हे नेमकं कशामुळे घडलं? पाहुयात...
GizmoChina च्या रिपोर्टनुसार, Foshan मधील Apple Store ने USB-C केबल वापरणार्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. स्टोअर कर्मचार्यांनी ओव्हर हिटिंगबद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या चार्जिंग पिनमुळे लोक वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करत असल्याचे दिसून आले आहे. अँड्रॉईड केबल वापरल्यामुळे फोन जास्त गरम होत असल्याचे सांगितले जाते.
हिटमुळे स्फोट होऊ शकतो!
ही समस्या सिंगल-रो 9-पिन आणि सिंगल-रो 11-पिन कनेक्टरमुळे होते. एक युजर iPhone 15 Pro Max वापरत असतानाचा अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितलंय की, आयफोन वापरत असाल तर apple च्या चार्जरनेच फोन चार्ज करा. टाईप सीचं चार्जर स्लॉट मिळाल्यामुळे अनेक लोक साध्या चार्जरने फोन चार्ज करताना दिसतात. मात्र प्रत्येक चार्जरची कॅपेसिटी वेगळी असते. अनेकदा मोबाईल चार्ज होत असताना गरम होते. याचा अर्थ की तुमच्या मोबाईलपेक्षा चार्जर हाय व्हॅटचा असतो. त्यामुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो आणि परिणामी तुम्हालाही धोका होऊ शकतो.
अॅपलचा केबल वापरा!
युजरने सांगितल्याप्रमाणे रात्रभर फोन चार्ज करण्याची स्टोरीही यूजरने शेअर केली आहे. फोन चार्जिंगला ठेवल्यामुळे खूप गरम झाला होता. गरम झाल्यावर केबल वितळली आणि युजरचा हातही भाजला. यामुळे युजरचे बरेच नुकसान झाले. महागडा फोन घेतला मात्र त्याचा वापरदेखील नीट करायला हवा, असं युजरने सांगितलं. कोणत्याही केबलने चार्ज करु नका अन्यथा केबल वितळण्याचीदेखील शक्यता असल्याचं युझरने स्पष्ट केलं आहे.
हिटसंदर्भात अनेक तक्रारी
यासंदर्भात ट्विटरवरही अनेकांनी रिव्हूव्ह देताना फोनच्या हिट बाबत पोस्ट केल्या आहेत. त्यांनी हा फोन लवकर गरम होतो आणि त्यामुळे युजरला धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर आयफोन 15 असेल तर तो अॅपलच्या चार्जरनेच चार्ज करण्याचा सल्ला अनेकजण देताना दिसत आहे.
The natural titanium iPhone 15 Pro gets extremely hot, so much so that it becomes difficult to hold. Furthermore, it heats up after just a 2-minute FaceTime call or when scrolling through reels for 8-10 minutes. This is a new issue for me, as I've never encountered this with any… pic.twitter.com/Qu0QK1xGLd
— Mohit Verma (@itz_mohitverma) September 25, 2023
इतर महत्वाची बातमी-