Budget Smartphone : iPhone 15 Pro सारखे फीचर्स देणार हा 10 हजाराचा मोबाईल फोन
Smartphone Under 10 Thousand Rupee : आयफोनमध्ये असणारा Dynamic Island चे फीचर आता या बजेट स्मार्टफोनमध्ये ही असणार आहे.
Budget Smartphone : Dynamic Island चे फीचर ऑफर करणारा आयफोन हा एकमेव फोन नाही. आता Infinix हा मोबाईल फोनसुद्धा हे फीचर देण्याची तयारी करत आहे आणि तुम्हाला ते देखील अगदी कमी किमतीत मिळणार आहे. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही हे फीचर मिळवू शकता. Infinix ही कंपनी स्वस्त स्मार्टफोन देण्यासाठी ओळखली जाते. Infinix Smart 8HD हा देखील कंपनीचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन आहे. कमी किंमतीत दमदार दर असल्याने या फोनला मोठी मागणी आहे.
स्मार्ट 7 सीरिजच्या यशानंतर ही सीरिज बाजारात दाखल झाली आहे. नवीन अपग्रेडमध्ये तुम्हाला इतर अनेक फीचर्स देखील मिळणार आहेत. मात्र, फोनशी संबंधित संपूर्ण माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही. Infinix आपल्या यूजर्ससाठी काही खास फीचर्स देखील आणणार आहे. त्यात नवीन नॉच फीचरचाही समावेश करण्यात येणार आहे. स्मार्ट सीरिजमध्ये पहिल्यांदाच हे फीचर लाँच केले जाणार आहे.
मॅजिक रिंगमध्ये फेस अनलॉक, बॅकग्राउंड कॉल्स मॅनेज करणे, डिस्प्ले चार्जिंग अॅनिमेशन यासह अनेक फिचर्स देण्यात येणार आहेत. Smart 8HD च्या मदतीने, Infinix बाजारातील ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या 8 डिसेंबरपासून बाजारात हा मोबाईल फोन उपलब्ध होणार आहे. Infinix च्या नवीन लाँचमुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बजेट फ्रेंडली फीचरसह लाँच होणाऱ्या मोबाईल फोनला कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि फेस आयडी सेन्सर देखील दिलेला आहे. डिस्प्लेमध्ये असलेल्या Dynamic Island मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाते.
किंमत फक्त 10 हजार; घरातील आजी-आजोबांसाठी बेस्ट फोन कोणते?
iTel P55 फोन आणि फिचर्स
iTel P55 हा 5G स्मार्टफोन आहे, त्याचे डिझाइन आपल्याला खूप आकर्षक वाटू शकते. या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आहे, फोन मीडियाटेक डायमेंशन 6080 एसओसी चिपसेटसह देण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा दिवसाच्या उजेडात उत्तम शॉट्स कॅप्चर करतो. यात तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळते. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर अॅमेझॉनवर 26 टक्के सवलतीसह केवळ 9,999 रुपयांत मिळत आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP आहे. याशिवाय सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8 MPचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Moto G14 किंमत आणि फिचर्स
Moto G14 हा फोन दीर्घ बॅटरी बॅकअपसह येतो. फोटो आणि व्हिडिओसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा 2 MP आहे. याच्या फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही अॅमेझॉनवरून फक्त 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.